Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Renault ची किफायतशीर SUV Kiger लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) आज भारतात लाँच केली आहे.

Renault ची किफायतशीर SUV Kiger लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 5:55 PM

मुंबई : रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) आज भारतात लाँच केली आहे. नवीन रेनॉ कायगरची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरु होते. तर या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 9.55 लाख रुपये इतकी आहे. भारतीय बाजारात Kiger ची टक्कर ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite), किआ सोनेट (Kia Sonet), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300) आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) या गाड्यांशी होणार आहे. (Renault launches SUV Kiger at Rs 5-45 lakh in India Details here)

रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण करु शकतं. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा असेल. AMT सह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. रेनॉ कायगरमध्ये मल्टीसेंस ड्राइव्ह मोड फीचर देण्यात आलं आहे. ही कार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोडवर चालवता येईल. ही कार 4 वेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ मॉडलचा समावेश आहे.

बेस्ट एसयूव्ही?

या गाडीमधील इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे. थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील, 8 स्पीकर साउंड सिस्टम, फ्लोटिंग टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग पॅड, सिलेक्टिव ड्राइव्ह मोड, प्रीमियम क्वालिटी सीट्स, प्लास्टिक कवर्ड दरवाजे, फिलिप्स एयर प्यूरीफायर, रियर एसी वेंट्स, 405 लीटर बूट स्पेससारख्या अनेक फीचर्समुळे ही कार बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. त्यामुळेच जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची कंपनी Renault ने आज कायगर (Kiger) ही एसयूव्ही बाजारात सादर केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.45 लाख रुपये आहे. याआधी Nissan कंपनीची Magnite ही एसयूव्ही नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault ची Kiger सर्वात स्वस्त एसयूव्ही ठरू शकते.

Renault Kiger चं कसं आहे डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारं जागतिक उत्पादन असणार आहे. नवीन रेनॉ कायगर ही कार किया सोनेट, ह्युंदाई वेन्यू, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा केयूव्ही 300 आणि इतर कार्ससाठी तगडा स्पर्धक असणार आहे.

हेही वाचा

Honda ची आफ्रिका ट्विन अ‌ॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत

(Renault launches SUV Kiger at Rs 5-45 lakh in India Details here)

हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा.
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ.
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले.
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड.
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.