मुंबई : रेनॉल्ट किगर एसयुव्हीने (Renault Kiger SUV) भारतातील सब कॉम्पॅक्ट (Sub compact) 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जून 2022 च्या एसयुव्ही सेलिंग रिपोर्टमध्ये ही बाब अधिक ठळकपणे अधोरेखित झालेली आहे. गेल्या महिन्यात रेनॉल्ट किगरच्या 3411 युनिट्सची विक्री झाली होती. 6 लाखांपेक्षा कमी किमतीत रेनॉल्ट किगर त्याच्या दमदार लुकमुळे आणि अनेक फीचर्समुळे (features) ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. जर तुम्ही बजेट SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी रेनॉल्ट किगरचा उत्तम पर्याय आहे. या लेखात आपण या एसयुव्हीच्या फीचर्स, किंमत आणि लूकबाबत माहिती घेणार आहोत.
Renault Kiger भारतात RXE, RXL, RXT, RXT(O) आणि RXZ या विविध सेगमेंटमध्ये 5.99 लाखांपासून ते 10.62 लाख रुपयांच्या एक्सशोरूम किमतींसह 5 ट्रिम लेव्हलवर 20 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही 5 सीटर SUV 2 इंजिन पर्यायांसह तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यात 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, वायरलेस चार्जिंग, ऑटो क्लायमेट कंट्रोल, मल्टिपल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेंसर्ससह अनेक स्टॅंडर्ड आणि सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार किगरचा मायलेज 20 kmpl पर्यंत आहे.
व्हेरिएंट आणि त्यांच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास बेस मॉडेल Renault Kiger RXE मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख रुपये आहे. Renault Kiger RXL मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.95 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.50 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.82 लाख रुपये आहे. Renault Kiger RXL AMT पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.04 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.05 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT AMT Opt पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.37 लाख लाख रुपये आहे. Renault Kiger RXZ मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.39 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT AMT Opt DT पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.60 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.62 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt Turbo Manual Petrol व्हेरियंटची किंमत 8.92 लाख रुपये आहे. Renault Kiger RXZ AMT पेट्रोल प्रकाराची किंमत 8.94 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt Turbo DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 9.15 लाख रुपये आहे.