मारुतीच्या लोकप्रिय कारच्या किमतीत वाढ, कच्चा माल महागल्याने परिणाम
मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) कंपनीने नुकत्याच आपल्या कारच्या किमतींमध्ये वाढ (Rising Prices) केली आहे. यामुळे देशातल्या सर्वात मोठ्या प्रवासी वाहन निर्मात्या कंपनीची वाहने खरेदी करणे आता महागडे होणार आहे.
मुंबई : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) कंपनीने नुकत्याच आपल्या कारच्या किमतींमध्ये वाढ (Rising Prices) केली आहे. यामुळे देशातल्या सर्वात मोठ्या प्रवासी वाहन निर्मात्या कंपनीची वाहने खरेदी करणे आता महागडे होणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी परफेक्ट मानल्या जाणाऱ्या अल्टो कारच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्ही आता ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. दरम्यान, मारुतीसह टाटा, ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या विविध कंपन्यांनीसुध्दा आपल्या कारच्या किमतींमध्ये वाढ करणार असल्याचे जाहिर केले आहे. सर्वच मोठ्या कंपन्यांच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याने सामान्यांसाठी कारचे स्वप्न काहीसे कठीण होणार आहे. दरम्यान, सर्वच कच्च्या मालांच्या (Raw material) किमतीत वाढ होत असल्याने परिणामी कारच्या किमतींमध्येही वाढ होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मारुती अल्टो
मारुती अल्टो ही कार सर्वसामान्यांसाठी एक बजेट कार मानली जाते. मध्यवर्गीय कुटुंब अल्टोला प्राधान्य देत असत. या कारमध्ये 796 सीसीचे इंजीन देण्यात आले आहे. 47 एचपीची पॉवर जनरेट करण्यास की कार सक्षम आहे. कंपनीने वेळावेळी या कारमध्ये अपडेट दिेले आहेत. पाच व्यक्ती आरामात या कारने प्रवास करु शकतात. या कारची जुनी किंमत 4.02 लाख रुपये होती. तर आता नवी किंमत 4.08 लाख इतकी आहे.
मारुती एस प्रेसो
मारुतीच्या एस प्रेसो कारची जुनी किंमत 3.94 लाख रुपये होती. तर आता नवीन किंमत वाढून 3.99 लाख इतकी झाली आहे. या दोन्ही एक्स शोरुम किंमती आहेत. या कारला 998 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. सोबतच ही कार सीएनजीवर 31.19 किमीचे मायलेज देते.
मारुती स्विफ्ट
जुन्या मारुती स्वीफ्ची किंमत 5.84 लाख रुपये होती. आता नवीन किमतीनुसार 5.91 लाख रुपयांना ती खरेदी करता येणार आहे. मारुतीची ही एक सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये 1197 सीसीचे इंजीन मिळते, सोबतच 88.5 एचपीची पॉवर जनरेट होते.
मारुती विटारा ब्रेझ्झा
विटारा ब्रेझ्झाची नवीन किंमत 7.73 लाखांपासून सुरु होउन 7.84 लाखांपर्यंत आहे. या देखील एक्स शोरुम किंमती आहेत.
कार : जुनी किंमत (एकस शोरुम) – नवीन किंमत (एक्स शोरुम)
- अल्टो – 4,02,696 रुपये – 4,08,000 रुपये
- एस प्रेसो – 3,94,307 रुपये – 3,99,500 रुपये
- स्वीफ्ट – 5,84,205 रुपये – 5,91,900 रुपये
- वेगन आर – 5,40,383 रुपये – 5,47,500 रुपये
- इको – 4,57,178 रुपये – 4,63,200 रुपये
- सेलेरिओ 5,18,175 5,25,000 रुपये
- डिझायर 6,15,888 6,24,000 रुपये
- व्हिटारा ब्रेझ्झा 7,73,808 7,84,000 रुपये
इतर बातम्या
वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर
Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती
3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स