Road Tax: गाड्या आणखी महागणार, सरकार रोड टॅक्स वाढवण्याच्या तयारीत

देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. याआधी सोमवारी, भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India (MSI) ने त्यांच्या संपूर्ण मॉडेल रेंजच्या किमती 0.9 टक्के आणि 1.9 टक्क्यांच्या दरम्यान तत्काळ प्रभावाने वाढवल्या आहेत.

Road Tax: गाड्या आणखी महागणार, सरकार रोड टॅक्स वाढवण्याच्या तयारीत
Vehicles Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:33 PM

Road Tax: तुम्ही दिल्लीत (Delhi) राहत असाल आणि कार घेण्याचा विचार करत असाल, तर हे काम लवकर पूर्ण करा. कारण येत्या काही दिवसांत दिल्लीत कार खरेदी करणे तुम्हाला महागात पडू (Car Price Hike) शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत व्यावसायिक वाहने (कमर्शियल व्हेईकल), कार आणि एसयूव्हीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण परिवहन विभागाने काही ठराविक श्रेणींच्या वाहनांवरील रोड टॅक्स (Delhi Road Tax) वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. दिल्लीतील खासगी वाहनांवरील रोड टॅक्स सध्या इंधनाचा प्रकार आणि प्राईस रेंजनुसार 12.5 टक्के आहे. दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने 2022-23 च्या वार्षिक बजेटमध्ये विविध कर आणि शुल्कांमधून 2,000 कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

यासोबतच देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. याआधी सोमवारी, भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India (MSI) ने त्यांच्या संपूर्ण मॉडेल रेंजच्या किमती 0.9 टक्के आणि 1.9 टक्क्यांच्या दरम्यान तत्काळ प्रभावाने वाढवल्या आहेत. कंपनी, जी सध्या अल्टो ते एस-क्रॉस पर्यंत कारची रेंज विकते, त्यांनी वाढत्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीवर 18 एप्रिलपासून दरवाढ लागू होऊन, सर्व मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमतींमध्ये (नवी दिल्ली) 1.3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यात, दिल्ली परिवहन विभागाने बस मार्गांचे उल्लंघन करणाऱ्या छोट्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसेससाठी निश्चित केलेल्या लेनमध्ये पार्क केलेली 50 हून अधिक वाहने हटवली असून या वाहनांच्या चालकांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. टो केलेल्या वाहनांमध्ये छोट्या कार, ऑटो, ई-रिक्षा आणि दुचाकी यांचा समावेश होतो.

महिंद्रा, टोयोटाच्या गाड्या महागल्या

यासह, महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या आठवड्यात त्यांच्या वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ही वाढ सुमारे 63,000 रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे, टोयोटा किर्लोस्कर मोटरने 1 एप्रिलपासून आपल्या संपूर्ण मॉडेल श्रेणीच्या किमतीत 4 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. याशिवाय लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडी, मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्ल्यू यांनीही नुकतीच दरवाढीची घोषणा केली आहे.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.