नेमकी कशामुळे रॉल्स रॉयसची किंमत पोहचते 10 ते 15 कोटींच्या घरात, काय असतं खास जाणून घ्या

नुकतेच देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 13.14 कोटी रुपयांची रॉल्स रॉयस कलिनन कारची खरेदी केली आहे. जर तुम्हाला जगातील सर्वात महागडी कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे रॉल्स रॉयस असणे गरजेचे आहे. रॉल्स रॉयस जगातील सर्वाधिक महागड्या गाड्यांमधील एक आहे.

नेमकी कशामुळे रॉल्स रॉयसची किंमत पोहचते 10 ते 15 कोटींच्या घरात, काय असतं खास जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 10:54 AM

जगातील सर्वाधिक महागड्या गाड्यांच्या (Expensive car) यादीमध्ये रॉल्स रॉयसचे (Rolls Royce) नाव अग्रभागी घेतले जात असते. रॉल्स रॉयस कार असणे म्हणजे आता एक स्टेटस सिंबोल बनला आहे. नुकतेच देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी 13.14 कोटी रुपयांची रॉल्स रॉयस कलिनन कारची खरेदी केली आहे. जर तुम्हाला जगातील सर्वात महागडी कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे रॉल्स रॉयस असणे गरजेचे आहे. रॉल्स रॉयस जगातील सर्वाधिक महागड्या गाड्यांमधील एक आहे. परंतु साहजिकच सर्वसामान्यांना प्रश्‍न पडतो, की या गाडीमध्ये असं काय खास आहे, की या कारची किंमत इतक्या कोट्यवधींच्या घरात पोहचते. या लेखातून या सर्व प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस्टमाईझेशन सर्व्हिसेस

रॉल्स रॉयस कंपनी आपल्या ग्राहकांना कस्टमाइझेशनची सुविधा उपलब्ध करुन देते. रॉल्स रॉयस कार सर्वाधिक महाग असल्याचे हेही एक मोठे कारण आहे, की या कार इतक्या महाग असतात. कस्टमाइझेशन म्हणजे यात ग्राहक आपल्या आवडीनुसार कारचा कलर, टायर, डेशबोर्ड आदी विविध बदल करु शकतात. कंपनी आपल्या ग्राहकांना कारच्या एक्सटीरिअर आणि इंटीरियरमध्ये बदल करण्याची सर्व्हिस प्रदान करतात.

हातांमधील कारागिरी

कस्टमाइझेशन ही अतिशय जबरदस्त सर्व्हिस आहे. ही सुविधा सर्वच कार निर्मात्या कंपन्या देत नाहीत. यामुळे कस्टमाइझेशन सर्व्हिसेस महाग असते. कस्टमाइझेशनमुळे ग्राहक आपल्या कारला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्या बजेटमध्ये आणू शकतात. कस्टमाइझेशनमध्ये कारला तयार करण्यात निपून असलेले कर्मचारी आपल्या पूर्ण प्रयत्नांनी कारला अधिक आकर्षित बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

हे सुद्धा वाचा

पेंटमध्ये डायमंड आणि गोल्डचा वापर

रॉल्स रॉयसमध्ये कस्टमाइझेशनअंतर्गत ग्राहकांना कारला आवडीनुसार पेंट करण्याची सुविधा मिळते. कंपनीच्या जवळ 44 हजारांहून जास्त कलर ऑप्शन आहेत. जर तुम्ही कलर पेंटने संतुष्ट नसाल तर, पेंटमध्ये डायमंड, गोल्ड किंवा अजून काही मौल्यवान घटकांचा समावेश करु शकतात. या शिवाय कारागिर आपल्या हातांनी पूर्ण कारची डिटेलिंग करीत असतात. कारची डिटेलिंग करण्यासाठी कारागिर स्पेशल ब्रशचा वापर करीत असतात.

कारमध्ये दिसतात तारे

दरम्यान, कारच्या टायरमध्ये हवेच्या ऐवजी फोमला भरण्यात येत असते. कारला वर्दळ व गर्दीपासून वाचविण्यासाठी इंसुलेशनचा वापर केला जात असतो. डॅशबोर्ड देखील ग्राहकांच्या आवडीनुसार डिझाईन केला जात असतो. काही कस्टमर्स डॅशबोर्डमध्ये गोल्ड आणि डायमंडशिवाय महागडे आर्टवर्कचाही वापर करु शकतात. ग्राहकांना स्टारलाइट हेडलाइनवर सर्व्हिसदेखील मिळते, ज्यामुळे कारच्या छतावर तारे दिसू शकतात.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.