बुलेटप्रेमींसाठी मोठी बातमी, किमती बदलल्या, बुलेट स्वस्त की महाग?

| Updated on: Jan 12, 2021 | 5:31 PM

Royal Enfield ची सर्वांत स्वस्त असणारी बाईक बुलेट 350 आता महाग झाली आहे.

बुलेटप्रेमींसाठी मोठी बातमी, किमती बदलल्या, बुलेट स्वस्त की महाग?
Follow us on

नवी दिल्ली : Royal Enfield ची सर्वांत स्वस्त असणारी बाईक बुलेट 350 आता महाग झाली आहे. या बाईकची किंमत वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार बुलेट 350 ची किंमत आता 1 लाख 27 हजार 284 रुपयांपासून सुरुवात होईल. (Royal Enfield Bullet 350 price hike in january 2021)

Royal Enfield ची बुलेट 350 ही बाईकप्रेमींची आवडती बाईक आहे. परवडणारी आणि टेक्निलकदृष्ट्याही बाईकप्रेंमींसाठी ही बाईक खास आहे. मात्र आता कंपनीने किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने बाईकप्रेमी निराश झाले आहेत. कंपनीने किंमत जरी वाढवली असली तरी बाईकमध्ये कोणताही बदल होणार किंवा क्रिएशन नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

आता या किंमतीत मिळणार बुलेट 350 बाईक

मॉडेल                      जुनी किंमत          नवी किंमत
Bullet X 350         1,27,094           1,27,284
Bullet 350             1,33,261           1,33,452
Bullet ES X 350   1,42,705          1,42,895

बुलेट 350 चं दमदार इंजिन

या बाईकमध्ये 346 CC कॅपॅसिटीचं सिंगल सिलेंडर फ्लूएल इंजेक्टेड इंजिन आहे. या इंजिनची पॉवर 19.1 BHP आहे. हे इंजिन 28 NM पीक टॉर्क जनरेट करतं. या बाईकला 5 गिअर आहेत. तसंच ही बाईक चार कलरमध्ये उपलब्ध आहे.

कंपनीची विक्री वाढली

डिसेंबर 2020 मध्ये Royal Enfield ने Classic 350 च्या बरोबरच आताच लॉन्च केलेल्या Meteor 350, बुलेट 350 या 63 हजार 580 यनिट विकल्या. 2019 च्या तुलनेत 33 टक्के वार्षिक वाढ होती. याच रितीने विक्रीत 10.73 इतकी वाढ महिन्याने होतीय.

(Royal Enfield Bullet 350 price hike in january 2021)

संबंधित बातम्या

BMW ची नवीन लक्झरी 220i M Sport कार लाँच, 7.1 सेकंदात 100Km स्पीड पकडणार

KTM आणि Husqvarna ने मोटारसायकल्सच्या किंमती वाढवल्या, जाणून घ्या कोणत्या बाईक महागल्या?