मार्केटमध्ये Royal Enfield चाच बोलबाला, आता बाजारात धुमाकूळ घालायला येतीये नवी बाईक

Royal Enfield Goan Classic 350: तुम्ही रॉयल एनफिल्ड घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, आज आम्ही तुम्हाला बाईकच्या एका नव्या मॉडेलविषयी माहिती सांगणार आहोत. तुम्हाला क्लासिक 350 किंवा बुलेट 350 सारखी बाईक खरेदी करायची नसेल तर कंपनी तुमच्यासाठी खास बाईक घेऊन येत आहे.

मार्केटमध्ये Royal Enfield चाच बोलबाला, आता बाजारात धुमाकूळ घालायला येतीये नवी बाईक
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 7:06 PM

बाईक घ्यावी तर रॉयल एनफिल्ड हीच, असं अनेक बाईकप्रेमी म्हणतात. त्यातही रॉयल एनफिल्ड बाईकच्या लोकप्रियतेला उत्तरच नाही. आता ही कंपनी तुमच्यासाठी एक नवीन बाईक घेऊन आली आहे. तुम्हाला क्लासिक 350 किंवा बुलेट 350 सारखी बाईक खरेदी करायची नसेल तर हरकत नाही. कंपनी तुमच्यासाठी खास बाईक आणली आहे, याविषयी खाली विस्ताराने वाचा.

23 नोव्हेंबरला Royal Enfield Goan Classic 350 लॉन्च करणार आहे. जे-सीरिज इंजिन प्लॅटफॉर्मवर तयार होणारी ही पाचवी बाईक आहे. याआधी रॉयल एनफिल्ड मेटिओर, क्लासिक, हंटर आणि बुलेट बाजारात आल्या आहेत.

Royal Enfield Goan Classic 350 ही एक उत्तम दिसणारी बॉबर स्टाईलची बाईक असेल, ज्यात क्लासिक 350 सारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये रॉयल एनफिल्ड 350 प्रमाणेच 349 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन वापरले जाईल. तर याचे जास्तीत जास्त आउटपुट 20 एचपी आणि 27 एनएम टॉर्क असू शकते. अगदी Royal Enfield Goan Classic 350 ची मुख्य फ्रेम देखील क्लासिक 350 सारखीच असण्याची शक्यता आहे. Royal Enfield Goan Classic 350 यात स्टायलिंग, पेंट पर्याय आणि रायडिंग पोझिशनमध्ये फरक करणे अपेक्षित आहे.

जावा 42 बॉबर आणि पेराक या क्लासिक लिजेंड्सच्या तुलनेत रॉयल एनफिल्ड 350 सीसी बॉबरमध्ये मागील बाजूस प्रवासी बसू शकते.

Royal Enfield Goan Classic 350 बाईकला मागचे सीट

या बाईकवरील मागील राईडचा सेटअप शॉटगन आणि क्लासिक 650 ट्विनवर दिसणाऱ्या सेटअपसारखाच असण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रवासी सेटअप वाहून नेण्यासाठी ही फ्रेम रायडरच्या स्कूप-आऊट सीटवर ठेवण्यात येणार आहे. जावा बॉबर्सशी स्पर्धा करण्याच्या तुलनेत सुविधा प्रदान करण्यासाठी हे पाऊल Royal Enfield Goan Classic 350 साठी चांगले ठरू शकते.

Royal Enfield Goan Classic 350 ची चाके कशी असतील?

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये उत्तम रंगांचे पर्याय मिळू शकतात. मागील स्पाय इमेजनुसार, Royal Enfield Goan Classic 350 व्हाईटवॉल टायर्सवर चालेल. तर चाचणीदरम्यान हे बहुतेक वायर-स्पोक व्हील्ससह पाहिले गेले आहे. रॉयल एनफिल्ड पर्याय म्हणून अलॉय व्हील्स देखील देऊ शकते.

Royal Enfield Goan Classic 350 ची किंमत किती?

Royal Enfield Goan Classic 350 ची किंमत 1.93 लाख ते 2.30 लाख रुपयांदरम्यान आहे. Royal Enfield Goan Classic 350 लॉन्च करताना त्याची किंमत क्लासिक इतकीच असण्याची शक्यता आहे. मात्र याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 2.30 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

लवकरच रॉयल एनफिल्डच्या वार्षिक फेस्टिव्हल मोटोव्हर्समध्ये Royal Enfield Goan Classic 350 चा सर्व तपशील उघड केले जातील. या फेस्टिव्हलमध्ये कंपनी आपले पाचवे 350 सीसी मॉडेल लॉन्च करणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.