रॉयल एनफिल्डने आपल्या बाजारातील या बाईक्स परत मागविल्या, काय आहे कारण ?

रॉयल एनफिल्ड या दुचाकी निर्माता कंपनीने आपल्या बाजारातील बाईक्स परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या बाईकमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे कंपनीने तातडीने हा निर्णय घेतला आहे.

रॉयल एनफिल्डने आपल्या बाजारातील या बाईक्स परत मागविल्या, काय आहे कारण ?
Royal Enfield
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 6:50 PM

दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने आपल्या बाजारातील काही बाईक्स परत मागविल्या आहेत.कंपनीने नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंतच्या तयार झालेल्या सर्व बाईक्सना परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या नियमित चाचणी दरम्यान रियर किंवा साईड रिफ्लेक्टरमध्ये काही त्रूटी आढळल्याने हे पाऊल उचलले आहे. ही त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे.ज्याची सुरुवात दक्षिण कोरिया, अमेरिका आणि कॅनडा पासून होणार आहे. त्यानंतर भारत, ब्राझील, लॅटीन अमेरिका, युरोप आणि युकेमधील बाईक्स परत मागविण्यात येणार आहेत.

काय आहे गडबड ?

दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डच्या मते काही मोटर सायकलमध्ये रिफ्लेक्टर आवश्यक परावर्तक प्रदर्शन मानकांना पूर्ण करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बाईक्स चालविताना परिणाम होण्याचा धोका आहे. रिफलेक्टर योग्य प्रकारे प्रकाश परावर्तित करीत नसल्याचे उघडकीस आले आहे.अंधारात त्यामुळे इतरांना दुचाकी नीट दिसण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळू शकते त्यामुळे हे रियर आणि साईड रिफलेक्टर बदलण्यासाठी टप्प्या टप्प्याने या बाईक्स परत मागविल्या आहेत. रिकॉल्स केलेल्या बाईक्स संख्या कंपनीने गुप्त ठेवलेली आहे. परंतू ही संख्या काही हजारात असू शकते असे म्हटले जात आहे.

कंपनी मोफत दुरुस्त करणार फॉल्ट

या रिकॉल संदर्भात दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने म्हटले आहे की उच्चतम सुरक्षा मानके कायम रहाण्यासाठी हे आवश्यक पाऊल उचलण्यात आले आहे, जरी या समस्येच्या व्यापक स्वरुपात तक्रारी आलेल्या नसल्या तरी हे रिफलेक्टर बदलण्यात येणार आहेत. या साठी केवळ पंधरा मिनिटांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे कंपनीची सर्व्हीस टीम ग्राहकांशी संपर्क करणार आहे. या समस्येला दुरुस्त करण्यासाठी कंपनी जागतिक बाजारातील सर्व ग्राहकांच्या बाईक्सचे रिफलेक्टर मोफत बदलून देणार आहे.

शरद पवार यांचं सरकार येणार? अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले शरद पवार
शरद पवार यांचं सरकार येणार? अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले शरद पवार.
'दीड-दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'दीड-दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय.
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर.
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा.
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्...
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्....
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?.
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?.
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.