रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

| Updated on: Feb 13, 2021 | 12:49 PM

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार (Royal Enfield increased price of Classic 350 bike)

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350(Classic 350)च्या किंमतीत वाढ
Follow us on

नवी दिल्ली : देशातील दिग्गज मोटरसायकल निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने आपल्या बाईकच्या किंमतीत वाढ केली आहे. ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेली बाईक क्लासिक 350(Classic 350)च्या किंमतीत रॉयल एनफिल्डने वाढ केली आहे. रॉयल एनफिल्डने या बाईकच्या सर्व व्हेरियन्ट्सच्या दरात वाढ केली आहे. कंपनीने क्लासिक 350(Classic 350)च्या आधीच्या दरात 6 हजार रुपयांनी वाढ केली आहे. आधी या बाईकची किंमत 1,61,688 रुपये होती. आता यात 6 हजार रुपये वाढ करीत बाईकची किंमत 1,67,235 रुपये इतकी करण्यात आली आहे. (Royal Enfield increased price of Classic 350 bike)

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350च्या सर्व व्हेरिएन्ट्समध्ये वाढ

रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 के एस, चेस्टनट, रेडिच, प्योर रेड आणि एम सिल्वर मॉडेलची किंमत आता 1,67,235 रुपये इतकी झाली आहे. याव्यतिरिक्त अन्य कलर व्हेरिएन्ट्सच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. क्सासिक ब्लॅकची किंमत आधी 1,69,617 रुपये होती, आता 1,75,405 रुपये इतकी झाली. वहिंगन ग्रे स्पोक व्हील व्हेरिएन्टची किंमत आधी 1,71,453 रुपये होती आता 1,77,294 रुपये झाली. क्लासिक 350 च्या सिग्नल एअरबॉर्न ब्लू कलरसाठी आता 1,85,902 रुपये मोजावे लागणार आहेत. आधी सिग्नल एअरबॉर्न ब्लू कलरची किंमत 1,83,164 रुपये होती. गन ग्रे एलॉय व्हिल मॉडेलसाठी ग्राहकांना 1,89,360 रुपये मोजावे लागतील. आधी या मॉडेललाठी 1,79,809 रुपये द्यावे लागत होते. स्टील्थ ब्लॅक किंवा क्रोम ब्लॅकची किंमत 1,92,608 रुपये झाली आहे, आधी 1,86,319 रुपये इतकी होती. या बदललेल्या किंमती अहमदाबादच्या एक्स-शोरूमनुसार देण्यात आल्या आहेत. बाईकच्या नव्या किंमती या महिन्यापासून लागू करण्यात येतील. बाईकमध्ये किंमत वाढवण्याव्यतिरिक्त कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

लवकरच क्लासिक 350 चे नवे व्हर्जन येणार

रॉयल एनफिल्ड लवकरच क्लासिक 350 चे नवे व्हर्जन लाँच करणार आहे. नुकतेच चाचणीदरम्यान या बाईकची पहिली झलक पहायला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार ही नवी बाईक ‘जे’ प्लेटफॉर्मवर तयार करण्यात आली असून, या वर्षाअंती बाईक विक्रीसाठी उपलब्ध होईल. नवीन क्लासिक 350 बाईकमध्ये ट्राय नेविगेशन फिचरद्वारे ट्रिपर टर्न घेता येते. कंपनीने Meteor 350 आणि नुकतेच लाँच झालेल्या हिमालयन 2021 बाईकमध्ये हे फिचर दिले आहे. नवीन बाईकमध्ये 346cc क्षमतेच्या सिंगल सिलेंडर इंजिनचा प्रयोग करण्यात आला आहे, जे 19.1bhp पॉवर आणि 28Nm चे पीक टॉर्क जेनरेट करते. (Royal Enfield increased price of Classic 350 bike)

 

 

इतर बातम्या

आता ऑनलाईनच होणार वाहन विमा नूतनीकरण, फेक विमा पॉलिसीला बसणार आळा

टेस्लाकडून मॉडेल वाय लाँच; जाणून घ्या, ‘या’ इलेक्ट्रिक वाहनाची किंमत अन् फीचर्स