रॉयल एन्फील्डचा मोठा निर्णय, 7 देशातील 2.36 लाख बुलेट परत मागवल्या

रॉयल एनफील्डने भारत, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सात देशांमधून 236,966 बाईक्स परत मागवल्या आहेत.

रॉयल एन्फील्डचा मोठा निर्णय, 7 देशातील 2.36 लाख बुलेट परत मागवल्या
रॉयल एनफील्डच्या विक्रीत 9 टक्क्यांनी वाढ
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 6:31 PM

मुंबई : रॉयल एनफील्डने (Royal Enfield) भारत, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सात देशांमधून संयुक्तपणे मीटिओर 350 (Royal Enfield Meteor 350), क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) आणि बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) या मोटारसायकलींचे 236,966 युनिट्स रिकॉल केले (वाहनं परत मागवली आहेत) आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, इग्निशन कॉइलमध्ये (Ignition Coil) संभाव्य बिघाड असू शकतो, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये इंजिनमध्ये बिघाड, बाईकचा परफॉर्मन्स कमी होणे किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनीने रिकॉलचा निर्णय घेतला आहे. (Royal Enfield to recall over 2.36 lakh units of Meteor 350, Bullet 350 and Classic 350)

रॉयल एनफील्ड कंपनीने म्हटले आहे की, हा दोष नियमित अंतर्गत चाचणी दरम्यान (परीक्षणादरम्यान) आढळला होता आणि हा मुद्दा स्पष्टपणे ओळखला आहे. परत मागवलेल्या बाईक्स डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये मीटिओर 350 बाईकचादेखील समावेश आहे. डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान तयार केलेल्या मीटिओर 350 बाईक परत मागवल्या आहेत. तर जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान तयार केलेल्या आणि विकल्या गेलेल्या क्लासिक 350 आणि बुलेट 350 बाईक्स कंपनीने परत मागवल्या आहेत.

…म्हणून सर्व गाड्या परत मागवल्या

रॉयल एनफील्ड कंपनीने म्हटले आहे की, सर्व मोटारसायकलींमध्ये हा दोष आढळणार नाही, या काळात तयार करण्यात आलेल्या काहीच मोटारसायकलींमध्ये असा दोष आढळेल. परंतु कंपनीचे सुरक्षिततेचे नियम आणि खबरदारीच्या उपाययोजना पाहता सर्व मॉडेल्स रिकॉल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ 10 टक्के गाड्यांचे पार्ट्स बदलावे लागतील

आवश्यकता असल्यास, या मोटारसायकलींची तपासणी केली जाईल आणि कोणत्याही शुल्काशिवाय पार्ट्स बदलले जातील. रॉयल एनफील्ड कंपनीने अंदाज व्यक्त केला आहे की, 10 टक्क्यांपेक्षा कमी मोटारसायकलींमधील पार्ट्स बदलावे लागतील. रॉयल एनफील्डची सर्व्हिस टीम आणि स्थानिक डिलरशिप रिकॉलमुळे प्रभावित मोटरसायकलच्या मालकांपर्यंत पोहोचतील. तसेच ग्राहक डीलरशिपवर जाऊन महिती घेऊ शकतात किंवा कंपनीच्या हॉटलाईनवर कॉल करू शकतात.

संबंधित बातम्या

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

Royal Enfield प्रेमींसाठी वाईट बातमी, बुलेटसह ‘या’ बाईक्स 13000 रुपयांनी महागल्या

Royal Enfield । रॉयल एनफिल्डची बाजारात धूम, विक्रीत जबरदस्त वाढ, या बाईकला आहे जास्त मागणी

(Royal Enfield to recall over 2.36 lakh units of Meteor 350, Bullet 350 and Classic 350)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.