रेट्रो क्लासिक Honda CB350 ची तरुणाईला भूरळ, रॉयल एनफिल्डचे वाढले टेन्शन

Honda CB350 | Honda CB350 ने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या कंपनीचा रेट्रो-क्लासिक लूक आणि डिझाईन अनेकांना भूरळ घालत आहे. कंपनीने ही बाईक एकूण 5 रंगात आणि दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केली आहे. बाजारात या बाईकचा थेट मुकाबला Royal Enfield Classic 350 सोबत होईल.

रेट्रो क्लासिक Honda CB350 ची तरुणाईला भूरळ, रॉयल एनफिल्डचे वाढले टेन्शन
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 2:11 PM

नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : देशातील प्रमुख दुचाकी निर्मिती कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने बाजारात एक दमदार बाईक उतरवली आहे. या बाईकने 350 सीसी सेगमेंटवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. होंडा कंपनीने भारतीय बाजारात आपली नवीन Honda CB 350 बाजारात आणली आहे. होंडाने या बाईकचे नाव एकदम साधं-सोपं ठेवले आहे. CB350 असं या बाईकचं नाव आहे. या सेगमेंटमध्ये सध्या रॉयल एनफिल्डची दादागिरी आहे. या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचा 80 टक्के वाटा आहे. होंडा आता या नवीन दमदार बाईकच्या भरवशावर या सेगमेंटमध्ये घुसखोरी करणार आहे. कंपनीने या मोटारसायकलचे एकूण दोन व्हेरिंट्स लाँच केले आहे.

अशी आहे किंमत

होंडाच्या सीबी 350 डिलक्स मॉडेलची किंमत 1,99,900 रुपये तर डिलक्स प्रो मॉडेलची किंमत 2,17,800 रुपये असेल. ही एक्स शोरुम किंमत आहे. Honda ने या बाईकची किंमती प्रतिस्पर्धी कंपनीच्या तुलनेत कमी केलेल्या नाहीत. या सेगमेंटमध्ये होंडा दीर्घकालीन योजनेसह उतरली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. ग्राहक ही बाईक कंपनीच्या बिगविंग डीलरशीपच्या माध्यमातून बुक करु शकतात. लवकरत या बाईकची डिलव्हरी सुरु होईल.

हे सुद्धा वाचा

कशी आहे नवीन Honda CB 350

नवीन CB350 ला कंपनीने या सेगमेंटनुसार रेट्रो-मॉर्डन लूक दिला आहे. कंपनी मागील सीबी सीरिज मॉडेलच्या अगदी जवळ आहे. या बाईकमध्ये मस्कूलर फ्युअल टँक, स्टाईलिश ऑल-LED लायटिंग सिस्टम, राऊंड शेप एलईडी हँडलँप, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लँप देण्यात आले आहे. रेट्रो क्लासिक्स लूकसह एकूण 5 रंगात ही बाईक उपलब्ध होईल. प्रेशियस रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट क्रस्ट मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राऊन या रंगात ही बाईक उपलब्ध आहे.

इंजिन आणि परफॉर्मेंस

Honda CB 350 मध्ये कंपनीने 348.36 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. 5500 RPM वर 20.8 bhp ची पॉवर जनरेट करते. तर 3000 RPM वर 29.4 चा पीक टॉर्क जेनरेट करते. या बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?.
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.