1 रुपयांत 5 किलोमीटर धावणार, रिव्हर्स मोडसह नवी इलेक्ट्रिक स्कूटर दाखल

आयआयटी-दिल्लीच्या इनक्युबेटेड स्टार्टअप गॅलिओस मोबिलिटीने होप' नावाची इलेक्ट्रिक स्कूटर विकसित केली आहे,

1 रुपयांत 5 किलोमीटर धावणार, रिव्हर्स मोडसह नवी इलेक्ट्रिक स्कूटर दाखल
Hope Electric Bike
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 6:00 AM

दिल्ली : आयआयटी-दिल्लीच्या इनक्युबेटेड स्टार्टअप गॅलिओस मोबिलिटीने (Incubated Startup Galio Mobility) ‘होप’ नावाची इलेक्ट्रिक स्कूटर विकसित केली आहे, जी स्कूटर 20 पैशांमध्ये एक किलोमीटरपर्यंत धावेल. डिलिव्हरी आणि लोकल कम्यूटेशनसाठी ही एक किफायतशीर स्कूटर आहे. ही स्कूटर 25 किमी प्रति तास इतक्या स्पीडने धावू शकते. तसेच हे इलेक्ट्रिक वाहन सूट प्रकारात येते. ही स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणी करण्याचीदेखील आवश्यकता नाही. (Run 5 km in Rs 1, new electric scooter Hope with reverse mode)

‘होप’ (Hope Electric Ecooter) एका पोर्टेबल चार्जर आणि पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह सज्ज आहे, जी बॅटरी घरात वापरल्या जाणार्‍या सामान्य प्लगद्वारे चार्ज केली जाऊ शकते. सामान्य प्लगद्वारे ही बॅटरी 4 तासात पूर्णपणे चार्ज केली जाते. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार दोन वेगवेगळ्या रेंजच्या बॅटरी निवडण्याची सुविधा आहे. ग्राहक 50 किमी रेंज असलेली अथवा 75 किमी रेंज असलेल्या बॅटरीची निवड करु शकतो.

आयआयटी-दिल्लीने दिलेल्या माहितीनुसार ही स्कूटर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, डेटा मॉनिटरिंग सिस्टम आणि पेडल असिस्ट युनिटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. यात IoT आहे जे डेटा अॅनालिटिक्सद्वारे ग्राहकांना त्यांच्या स्कूटरबद्दल नेहमी माहिती देते. अशा प्रकारच्या फीचर्समुळे, होपची भविष्यात स्मार्ट आणि कनेक्टेड स्कूटर्सच्या श्रेणीमध्ये गणना केली जाईल.

रिव्हर्स मोडसह सज्ज

गॅलिओस मोबिलिटी (Galio Mobility) अशा काही कंपन्यांपैकी एक आहे जी स्कूटरमध्ये पेडल असिस्ट सिस्टमसारखे फीचर दिले आहे. प्रवासादरम्यान ग्राहक त्यांच्या सोयीनुसार पेडल किंवा थ्रॉटलचा पर्याय निवडू शकतात. सोयीस्कर पार्किंगसाठी होप विशेष रिव्हर्स मोड तंत्रज्ञानाने सज्ज आहे, ज्याच्या मदतीने कठीण अडचणीच्या ठिकाणीदेखील ही स्कूटर पार्क केली जाऊ शकते.

हेवी ट्राफिकमध्येही उपयोगी

होपमध्ये अत्याधुनिक वापरासाठी तयार केलेली मजबूत आणि कमी वजनाची फ्रेम आहे. स्कूटरची रचना आणि त्याच्या लीन डिझाइनमुळे ही स्कूटर हेवी ट्राफिकमधून बाहेर काढणं खूपच सोपं आहे. या वाहनात रिवॉल्यूशनरी स्लाइड आणि राइडच्या आवश्यकतेनुसार वजनाची वाहक उपकरणे किंवा मागील सीट वाहनात जोडली जाऊ शकते.

किंमत

यासंदर्भात कंपनीने म्हटले आहे की, ते सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांवर स्कूटर चार्जिंग व देखभालीसाठी हब स्थापित करणार आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीतही सेवा आणि मदत पुरवण्यासाठी कंपनी सज्ज असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत कंपनी बॅटरी बदलण्याची सुविधा प्रदान करेल. या बाईकची सुरुवातीची किंमत 46,999 रुपये इतकी आहे.

संबंधित बातम्या

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भारतात लाँच, किंमत फक्त…

Petrol ची टाकी फुल करण्याचं टेन्शन खल्लास, सिंगल चार्जमध्ये 60KM मायलेज देणारी इलेक्ट्रिक बाईक भेटीला

केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री

(Run 5 km in Rs 1, new electric scooter Hope with reverse mode)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.