Formula E: सचिन तेंडुलरकची Pininfarina Battista तून फेरी, आनंद महिंद्रा यांनी दिलं असं उत्तर

सचिन तेंडुलकर आणि गाड्या यांचं प्रेम सर्वश्रूत आहे. सचिनला फॉर्म्युला 1 जर्मन स्पर्धक मायकल शुमाकरनं फरारी गाडी देखील गिफ्ट दिली होती. नुकतंच सचिननं महिंद्रा पिनिनफॅरिना बट्टिस्टामधून रेस ट्रॅकवर फेरफटका मारला. यावेळी त्यांनी भविष्याबाबत मोठं विधान केलं.

Formula E: सचिन तेंडुलरकची  Pininfarina Battista तून फेरी, आनंद महिंद्रा यांनी दिलं असं उत्तर
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 1:38 PM

मुंबई : भारतात पहिल्या वहिल्या फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा पाहण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली होती. 2.8 किमी 18 वळणं असलेल्या ट्रॅकवर या स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेसाठी एकूण 11 संघ आणि 22 ड्रायव्हर्संनी सहभाग नोंदवला होता. फॉर्म्युला ई आणि फॉर्म्युला 1 रेसिंगमधील फरक म्हणजे कार..या स्पर्धेत उतरलेल्या कार इलेक्ट्रिक होत्या. पोर्शे, जग्वार, निसान आणि महिंद्रा या कंपन्यांच्या गाड्या यात सहभागी झाल्या होत्या. मात्र क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ड्राईव्हने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच काय महिंद्राच्या गाडीतून फेरफटका मारल्यानंतर मोठं वक्तव्य केलं. त्याचं हे वक्तव्य ऐकून आनंद महिंद्रा यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. तसेच त्यांना एखादी संधी मिळाली की सोडत नाही. आता खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर असल्याने त्यांनी त्याला उत्तर दिलं आहे.

काय म्हणाला होता सचिन तेंडुलकर?

सचिन तेंडुलकरने ट्वीट करत लिहिलं आहे की,”पिनिनफॅरिना बटिस्टा हे एक उत्तम उदाहरण आहे.ही इव्ही भविष्य आहे. ही वेगवान होती, आम्ही वेळेला आव्हान देऊन भविष्यात उतरण्यासारखं आहे!खरंच आनंद महिंद्रा आणि त्यांच्या टीमने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय कंपन्या जागतिक दर्जाच्या गाड्या बनवतात पाहून आनंद होतो.” मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ट्वीटला आनंद महिंद्रा यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उद्योगपती आनंद महिंद्रा?

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून उत्तर दिलं की, “तू तर आमच्या बट्टिस्टाला चांगली टॅगलाईन दिली आहे. वेळेला आव्हान देत भविष्यात उतरलो! छान..मास्टर ब्लास्टर गाडीत असताना असंच काहीसं सुचतं. तुला आमच्या गाडीत बसलेलं पाहून आनंद वाटला.” फॉर्म्युला ई स्पर्धा पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांच्यासह इतर भारतीय क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील दिग्गज नागार्जुन, राम चरण आणि दुलारे सलमान यांनीही हजेरी लावली होती.

काय आहे गाडीची खासियत?

महिंद्रा कंपनीने गेल्या वर्षी बट्टिस्टा गाडीचं लाँचिंग केलं होतं. हायपरकार बट्टिस्टाची किंमत 18 कोटी रुपये इतकी आहे.या गाडीमध्ये चार वेगवेगळे इलेक्ट्रिक मोटर दिले आहेत.या मोटर चारही चाकांना ऊर्जा देतात. इलेक्ट्रिक मोटर संयुक्तिकपणे 1900 एचपी पॉवर आणि 2300 एनएम टॉर्क जनरेट करतात. ही गाडी 1.86 सेंकदात 0 ते 100 चा वेग धरते. 12 सेंकदात ही गाडी 0 ते 300 चा वेग धरण्यास सक्षम आहे. या गाडीचा टॉप स्पीड 350 किमी प्रतितास आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.