मुंबई : पेट्रोलच्या किमतीत दिवसेंदिवस चढउतार पाहायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीत अनेक लोक इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहेत, परंतु जास्त किमतीमुळे त्यांची इच्छा अपूर्णच राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाडी बद्दल सांगणार आहोत, जिची किंमत 60 हजार रुपयांपेक्षा जास्त असूनही तुम्ही फक्त 27 हजार रुपयांमध्ये ती खरेदी करू शकता. तसेच यावर हप्त्यांचाही म्हणजे EMI चाही पर्याय आहे. कंपनीकडून त्याच्यावर वॉरंटीही मिळते.
काय आहेत फिचर्स
Honda Activa 125 Bikes 24 नावाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, जिथून ती फक्त तुम्ही 27,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही सेकंड हँड श्रेणीची स्कूटर असून, यामध्ये अनेक चांगले फीचर्स देखील देण्यात आलेत. मिळालेल्या माहितीनुसार, यात 12 महिन्यांची वॉरंटी आणि कॅशबॅक पर्यायसुद्धा मिळत आहे. या डीलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. Honda Activa 125 स्कूटर दिल्लीतील DL-08 RTO येथे नोंदणीकृत आहे. यासोबतच तिचं 13 हजार किलोमीटर रनिंग झालं आहे. हे 2017 चे मॉडेल आहे आणि ही सेकंड ओनर स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 124 सीसी इंजिन असून, ती एका लिटर पेट्रोलमध्ये 46.5 किमी मायलेज देते. तसेच तिचे वजन 111 किलो आहे. यात 5.3 लीटरची इंधन टाकी आहे. ही स्कूटर 8.5 bhp पॉवर जनरेट करू शकते.
किती आहे वॉरंटी?
या Honda Activa 125 मध्ये 12 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांच्या कॅशबॅकसह काही अटी आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हाला स्कूटर आवडत नसल्यास काही समस्या आल्यास तुम्हाला पैसे परत मिळू शकतात. कोणतीही सेकंड हँड स्कूटर खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. तसेच स्कूटर खरेदी करण्यापूर्वी, त्याची प्रत्यक्ष तपासणी नक्की करा.
इतर बातम्या :
Renault भारतात नवीन SUV लाँच करणार, Hyundai Creta, Kia Seltos आणि MG Astor SUV ला टक्कर
मारुती अर्टिंगाला टक्कर, Kia ची MPV सज्ज, जाणून घ्या लीक फीचर्स आणि लाँच अपडेट