मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार, किंमत 4 लाखांहून कमी, ‘या’ आहेत टॉप 4 कार्स

तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे, परंतु कुटुंब मोठे आहे आणि बजेट कमी आहे, अशा परिस्थितीत तुम्ही 7 सीटर बजेट कारचा विचार करायला हवा.

मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार, किंमत 4 लाखांहून कमी, 'या' आहेत टॉप 4 कार्स
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 9:31 AM

मुंबई : तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे, परंतु कुटुंब मोठे आहे आणि बजेट कमी आहे, अशा परिस्थितीत तुम्ही 7 सीटर बजेट कारचा (Seven seater Cars) विचार करायला हवा. विशेष म्हणजे कमी बजेटमध्ये मोठी कार खरेदी करायची असेल तर बाजारात बरेच पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही 7 सीटर कारंबद्दल सांगणार आहोत, ज्या स्वस्त आणि दमदार आहेत. या कार्सच्या किंमती 4 लाखांच्या आसपास आहेत. (Seven seater Cars under 5 lakhs of big family)

मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco)

मारुती कार भारतात सर्वाधिक विकल्या जातात. मारुती सुझुकीच्या 7 सीटर इकोला (Eeco) देशभरात मोठी मागणी आहे. मारुती सुझुकी इकोची किंमत 3,97,800 रुपये (दिल्ली एक्स शोरूम) इतकी आहे. इकोमध्ये 1196 सीसी 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 6000 आरपीएम वर 72.41 एचपीची शक्ती आणि 3000 आरपीएम वर 101 एनएम टॉर्क जनरेट करतं. मारुती सुझुकी इको पेट्रोल व्हेरिएंट 16.11 किमी प्रतिलिटर मायलेज देऊ शकतं, तसेच मारुती सुझुकी इको सीएनजीमध्ये 21.94 किमी प्रति किलो मायलेज देते.

डॅट्सन गो प्लस (Datsun Go Plus)

डॅटसन गो प्लस ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 4.20 लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी ही कार बेस्ट आहे. या कारचा लुकदेखील चांगला आहे. डॅटसन गो प्लसमध्ये 1198 सीसी 3 सिलेंडर SOHC पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5000 आरपीएम वर 67 Hp पॉवर आणि 4000 आरपीएमवर 104 एनएम टॉर्क निर्माण करतं.

रेनॉ ट्रायबर (Renault Triber)

स्वस्त आणि स्टायलिश 7 सीटर कार्सच्या यादीत रेनॉ ट्रायबर ही तिसरी कार आहे. 7 सीटर रेनॉ ट्रायबरची किंमत 5.20 लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7,50,000 रुपये इतकी आहे. मध्यम वर्गीय कुटुंबांसाठी ही एक उत्तम कार आहे. या कारचा लुक एखाद्या प्रीमियम कारसारखा आहे.

Renault Triber मध्ये 999cc चं 3 सिलेंडर इंजिन आहे, जे 6250 आरपीएम वर 71 एचपीची शक्ती आणि 3500 आरपीएम वर 96 एनएम टॉर्क उत्पन्न करतं. या कारच्या फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास ट्रायबरमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, दुसर्‍या आणि तिसर्‍या रो सीटसाठी एसी व्हेंट आणि सुरक्षिततेसाठी एअर बॅग्स आहेत.

मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

याशिवाय मारुती सुझुकी अर्टिगा हीसुद्धा मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी उत्तम कार आहे. या 7 सीटर कारची सुरूवात किंमत 7.59 लाख रुपये आहे. ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्येही उपलब्ध आहे. या कारला भारतात मोठी मागणी आहे.

इतर बातम्या

VIDEO | कशी होते गाड्यांची Crash Test? कारच्या प्रत्येक पार्टची चाचणी

पेट्रोल-डिझेलचा जमाना गेला, देशात CNG गाड्यांना वाढती मागणी, ‘या’ कंपनीकडून 1,57,954 कार्सची विक्री

Mahindra कंपनी XUV500 चं उत्पादन बंद करणार, जाणून घ्या कारण

(Seven seater Cars under 5 lakhs of big family)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.