भारतातील इलेक्ट्रिकल व्हेईकल सेगमेंटमध्ये Siemens ची एंट्री, हिंदुजा ग्रुपशी हातमिळवणी

भारतातील इलेक्ट्रिकल व्हेईकल सेगमेंटमध्ये सीमेन्स लिमिटेडची एंट्री होत आहे. कंपनीने त्यासाठी हिंदुजा ग्रुपशी हातमिळवणी केली आहे.

भारतातील इलेक्ट्रिकल व्हेईकल सेगमेंटमध्ये Siemens ची एंट्री, हिंदुजा ग्रुपशी हातमिळवणी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 6:59 AM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, भारतातील इलेक्ट्रिकल व्हेईकल सेगमेंटमध्ये सीमेन्स लिमिटेडची (Siemens Limited) एंट्री होत आहे. कंपनीने त्यासाठी हिंदुजा ग्रुपशी (Hinduja Group) हातमिळवणी केली आहे. (Siemens making entry into electrical vehicle segment in India with Hinduja Group)

सीमेन्स लिमिटेड (Siemens Limited) आणि हिंदुजा समूहाच्या (Hinduja Group) स्विच मोबिलिटी ऑटोमोटिव्ह लिमिटेडने विद्युत वाणिज्य वाहन विभागात (इलेक्ट्रिक कमर्शियल वाहन सेगमेंट) प्रवेश करण्यासाठी सामंजस्य करारावर (MOU – Memorandum of Understanding) स्वाक्षरी केली आहे. सीमेन्स लिमिटेड कंपनी सीमेन्स फायनॅन्शिअल सर्व्हिसेस (एसएफएस) म्हणूनही ओळखली जाते, ही सीमेन्स एजीची वित्तपुरवठा शाखा (फायनॅन्सिंग ब्रँच) आहे. स्विच मोबिलिटी ऑटोमोटिव्हने सांगितले की, त्यांनी भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारातील संधींचा उपयोग करण्यासाठी सीमेन्स लिमिटेडबरोबर हातमिळवणी केली आहे.

सीमेन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, स्विच मोबिलिटीद्वारे (Switch mobility) आमची इलेक्ट्रिक कमर्शियल वाहने भारतात आणली जातील, चार्जर्सची उर्जा-कार्यक्षमता वाढविण्यासाठी सीमेन्स चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सॉफ्टवेयर सोल्यूशन प्रदान करेल. सीमेन्सच्या म्हणण्यानुसार ते ई-मोबिलिटी-अॅज-ए-सर्व्हिस (ईमॅस), इंटिग्रेटेड डेपो एनर्जी मॅनेजमेंट, व्हेईकल-टू-ग्रिड (व्ही 2 जी) तसेच ऑन-साइट/ऑफ-साइट स्विच मोबिलिटीसह सहयोग करेल.

देशात शानदार इलेक्ट्रिक वाहनं निर्माण करणं हेच उद्दीष्ट

देशातील विविध व्यावसायिक वाहन ग्राहकांना कार्यक्षम, स्वस्त आणि टिकाऊ ई-वाहनं उपलब्ध करुन देणे हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. स्विच मोबिलिटीचे अध्यक्ष धीरज हिंदुजा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “भारत आणि यूकेमधील 230 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांच्या अनुभवासह आम्ही भारत, युरोप आणि बर्‍याच जागतिक बाजारांमध्ये स्विचच्या विस्तारामध्ये व्यापक वाढीची संधी पाहात आहोत.

ई-मोबिलिटीमध्ये सीमेन्स जागतिक लीडर

सीमेन्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथुर म्हणाले, “सीमेन्स व्यावसायिक वाहनांसाठी ई-मोबिलिटी सोल्यूशनमध्ये जागतिक लीडर आहे. आम्ही जगभरात इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांसाठी प्रकल्प राबवित आहोत. स्विच मोबिलिटीद्वारे आम्ही भारतातील वाढत्या ई-मोबाइल बाजारपेठेच्या गरजा भागविण्यासाठी उच्च-गुणवत्तेची टेक्नो-व्यावसायिक सोल्यूशन्स अंमलात आणण्याचा आमचा मानस आहे. ”

ई-मोबिलिटी क्षेत्रात सीमेन्सचा अनुभव कामी येईल

स्विच मोबिलिटी ऑटोमोटिव्ह आणि ओएचएम ही ग्लोबल मोबिलिटी कमर्शियल व्हेइकल्सची प्रमुख कंपनी अशोक लेलँड लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे. अशोक लेलँडने म्हटलं आहे की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी स्विच मोबिलिटी इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन उद्योग क्षेत्राला आपला अनुभव देत सीमेन्स उच्च कार्यक्षमता व चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तंत्रज्ञान निर्माण करेल.

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(Siemens making entry into electrical vehicle segment in India with Hinduja Group)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.