साधीसुधी कशाला, स्कोडाच घ्या ! किंमत आणि फीचर्स वाचलेत का ?

Skoda Kylaq launched: कार घ्यायची तर साधीसुधी कशाला स्कोडाच घ्या. कारण, बहुप्रतीक्षित Skoda Kylaq लॉन्च झाली आहे. या SUV एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपये आहे. Skoda Kylaq या कॉम्पॅक्ट SUV चे बुकिंग 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. Skoda Kylaq या SUV विषयी विस्ताराने जाणून घ्या.

साधीसुधी कशाला, स्कोडाच घ्या ! किंमत आणि फीचर्स वाचलेत का ?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 12:38 PM

ब्रँडेड SUV घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आता साधीसुधी कशाला ब्रँडेड कंपनीची म्हणजेच Skoda ची SUV घ्या. कारण, Skoda Kylaq लॉन्च करण्यात आली आहे. स्पर्धा करण्यासाठी सज्ज असलेल्या Skoda Kylaq ची टक्कर Hyundai Venue, Tata Nexon, Maruti Suzuki Brezza, आणि Kia Sonet सारख्या लोकप्रिय मॉडेल्सशी होईल. या SUV ची किंमत आणि इतर माहिती खाली विस्ताराने जाणून घ्या.

Skoda कंपनीने बहुप्रतीक्षित Skoda Kylaq भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लॉन्च केली आणि पहिल्यांदाच सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. या SUV ची प्रतीक्षा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनने सुसज्ज असलेल्या या SUV ची सुरुवातीची किंमत 7.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.

Skoda Kylaq SUV चा आकार किती?

Skoda Kylaq च्या आकाराचा विचार केला तर Skoda Kylaq ची लांबी 3,995 मिमी आहे आणि व्हीलबेस 2,566 मिमी आहे. हे सेगमेंटमध्ये महिंद्रा एक्सयूव्ही 3XO नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात 17 इंचाची अलॉय व्हील्स असून त्याची ग्राऊंड क्लिअरन्स 189 मिमी आहे. मात्र, ग्राऊंड क्लिअरन्सच्या बाबतीत ती टाटा नेक्सॉनच्या थोडी मागे आहे. कारण नेक्सनमध्ये तुम्हाला 208 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स मिळते.

Skoda Kylaq SUV चा परफॉर्मन्स कसा?

Skoda Kylaq SUV मध्ये फक्त एकच पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. यात 1.0 लीटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 115 पीएस पॉवर आणि 178 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही Skoda Kylaq SUV चांगले मायलेज देईल अशी अपेक्षा आहे.

Skoda Kylaq SUV चे फीचर्स कोणते?

Skoda Kylaq SUV ची केबिन कुशाकसारखीच दिसत आहे. डॅशबोर्डची मांडणी सारखीच असून, साईड व्हेंट, क्लायमेट कंट्रोल पॅनेल, टू-स्पोक स्टीअरिंग आणि 8 इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर असे घटक दोन्ही मॉडेल्ससाठी समान आहेत. यात 10 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे

Skoda Kylaq SUV चे इतर फीचर्स कोणते?

Skoda Kylaq SUV च्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत कायलॅक या सेगमेंटमध्ये आपल्या अपेक्षांवर खरा उतरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. यामध्ये कंपनीने सनरूफ (सिंगल पॅन), कीलेस एंट्री, वायरलेस फोन चार्जर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले, फ्रंट सीट व्हेंटिलेशन आणि लेदरेट अपहोल्स्ट्री सारखे फीचर्स दिले आहेत.

Skoda Kylaq ची केबिन कसे आहे?

केवळ ड्रायव्हरसाठीच नव्हे तर समोरच्या प्रवाशासाठीही पॉवर्ड सीट अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा देण्यात आली आहे. एकंदरीत कंपनीने प्राईस सेगमेंटच्या सर्व गरजा लक्षात घेऊन केबिन डिझाईन केली आहे. सर्व दरवाजांवर कपहोल्डर आहेत. फ्रंटमध्ये दोन सीटच्या मध्ये म्हणजेच मध्यभागी आर्मरेस्टची सुविधाही देण्यात आली आहे.

Skoda Kylaq SUV चे सेफ्टी फीचर्स कोणते?

Skoda Kylaq SUV त्याच एमक्यूबी-AO IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे जी स्कोडा कुशाक, स्लाविया आणि फोक्सवॅगन तायगुन सारख्या एसयूव्हीला पॉवर देते. याची अद्याप क्रॅश टेस्ट झाली नसली तरी इतर मॉडेल्सप्रमाणे यालाही 5 स्टार रेटिंग मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सर्वात वेगवान कॉम्पॅक्ट SUV

सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट माऊंट यांचा समावेश आहे. स्कोडाचा दावा आहे की, कायलॅक केवळ 10.5 सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग पकडू शकते, ज्यामुळे ही सेगमेंटमधील सर्वात वेगवान कॉम्पॅक्ट एसयूव्ही बनते.

Skoda Kylaq ची कुणाशी स्पर्धा?

स्पर्धा करण्यासाठी सज्ज असलेल्या Skoda Kylaq ची टक्कर ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकी ब्रेझा आणि किआ सोनेट सारख्या लोकप्रिय मॉडेल्सशी होईल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.