मायलेज एकदम भारी आणि फोनशी होणार कनेक्ट, हिरोची Super Splendor XTEC लाँच

हिरो कंपनीने सुपर स्प्लेंडर XTEC 125 सीसी बाइक लाँच केली आहे. नवी डिझाईन आणि अॅडव्हान्स फीचर्सह ही बाइक सादर करण्यात आली आहे. या गाडीचा मायलेजही जबरदस्त असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

मायलेज एकदम भारी आणि फोनशी होणार कनेक्ट, हिरोची Super Splendor XTEC लाँच
Hero Super Splendor XTEC ग्राहकांच्या भेटीला, मायलेजसह इतर वैशिष्ट्ये जाणून घ्याImage Credit source: Hero Motocorp
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 2:01 PM

मुंबई : हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडर ही देशातील सर्वात लोकप्रिय बाइक आहे. गेली अनेक वर्षे या बाइकनं आपलं राज्य चालवलं आहे. त्यामुळे कंपनीही या बाइकमध्ये काळानुरूप अपडेट करत मार्केटमध्ये लाँच करते. आता कंपनीने Hero Super Splendor XTEC ही बाइक लाँच केली आहे. हिरो बाइक कंपनीने स्टायलिंग अपडेट्स आणि प्रीमियम कनेक्टिव्हिटी फीचर्ससह बाजारात लाँच केली आहे.आतापर्यंत कंपनी स्प्लेंडरचं हे व्हेरियंट 100 सीसी इंजिनसह विकत होती. यात अपडेट करत XTEC वर्जनमध्ये 125 सीसी सुपर स्प्लेंडर लाँच केली आहे. चला जाणून घेऊयात या व्यतिरिक्त कंपनीने कोण कोणते फीचर्स दिले आहेत

Hero Super Splendor XTEC Price in India

नवा बाइक कंपनीने तरुणांच्या मागणी लक्षात घेऊन तयार केली आहे. हिरो सुपर स्प्लेंडर XTEC आता अपडेट करण्यात आली आहे. या बाइकमध्ये हाय इंटेंसिटी पोजिशिनिंग लॅम्प एलईडी हेडलॅम्पसह दिले आहेत. त्याचबरोबर फ्युअल इंडीकेटरसह फुल डिजिटल स्पीडोमीटर, सर्व्हिस रिमाइंडर आणि बाइकमध्ये काही तांत्रिक अडचण अल्यास इंडिकेटर दिलं आहे.

नव्या हिरो मोटरसायकलमध्ये कंपनीने कॉल आणि एसएमएस अलर्टसह ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी फीचर दिलं आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या बाइकमध्ये ड्युअल टोन स्ट्राइप्स आहेत. त्यामुळे बाइक दिसण्यास अधिक आकर्षक आहे. यात बाइक युएसबी पोर्ट दिला आहे. त्यामुळे बाइक चालवताना मोबाईल फोन चार्ज करू शकता.

Hero Super Splendor XTEC की इंजिन डीटेल्स

125 सीसी बीएस6 इंजिन असलेली ही बाइक 68 किमीचा मायलेज देते, असा कंपनीने दावा केला आहे. त्याचबरोबर बाइकचं इंजिन 7500 आरपीएमवर 10.7 बीएचपी पॉवर आणि 6000 आरएमपीवर 10.6 एनएम टॉर्क जनरेट करते.

Hero Super Splendor XTEC बाइकची किंमत

हिरो मोटारसायकल कंपनीने ही गाडी दोन व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. या बाइकच्या ड्रम व्हेरियंटची किंमत 83 हजार 368 रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे. तर डिस्क ब्रेक व्हेरियंटची किंमत 87 हजार 268 रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.