Suzuki ची 10.30 लाखांची बाईक पाहिलीत का? काय आहे विशेष

Suzuki V Strom 800DE : भारतीय बाजारात सुझुकीने तुफान आणले आहे. सुझुकीने V-Strom 800DE ही 10.30 लाख रुपयांची (एक्स-शोरूम) बाईक उतरवली आहे. या बाईकने तरुणाईचे लक्ष वेधले आहे. काय खास आहे या बाईकमध्ये, काय काय आहेत फीचर्स, जाणून घेऊयात..

Suzuki ची 10.30 लाखांची बाईक पाहिलीत का? काय आहे विशेष
सुझुकीची दमदार बाईक
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 3:18 PM

सुझुकीने भारतात V-Strom 800DE ही दमदार बाईक उतरवली आहे. या बाईकची किंमत 10.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किंमतीला उतरविण्यात आले आहे. ही नवीन साहसी दुचाकी भारतात यापूर्वीच्या V-Strom 650 ला पर्याय ठरतील. ही बाईक भारतात पूर्वीपासूनच विक्री करण्यात येत आहे. भारतात नवीन V-Strom 800DE ही बाईक तीन रंगात चॅम्पियन यलो, ग्लास मेट मॅकेनिकल ग्रे आणि ग्लास स्पार्कल ब्लॅकमध्ये उपलब्ध आहेत.

ऑफ रोडसाठी चांगला पर्याय

Suzuki V-Strom 800DE, कंपनी नवीनत्तम साहसी दुचाकी आहे. कंपनीच्या मीडल-वेट मोटरसायकल रेंज पैकी ही एक दुचाकी आहे. या रेंजमध्ये फुली-फेअर्ड सुझुकी GSX-8R आणि स्ट्रीट फोकस्ड GSX-8S यांचा पण समावेश आहे. 800DE हे एक ॲडव्हेंचर मॉडेल आहे. ही बाईक गुळगुळीत रस्तेच नाही तर ओबडधोबड, डोंगरी रस्त्यावर पण दमदार कामगिरी बजावेल. यामध्ये सुझुकी GSX-8R आणि स्ट्रीट-फोकस्ड GSX-8S चे इंजिन वापरण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

दमदार फीचर्स

  1. सुझुकी V-Strom 800DE दमदार ॲडव्हेंचर बाईक आहे. यामध्ये दोन्ही बाजूने Showa सस्पेंशन देण्यात आले आहे. त्याचे ट्रॅव्हल 220mm आहे. तर या बाईकचा ग्राऊंड क्लिअरन्स 220mm आहे. सस्पेंशन तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ॲडजस्ट करता येतात. या दुचाकीच्या मागे आणि पुढे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. त्यासोबत ड्युएल चॅनल एबीएस पण मिळतो.
  2. डोंगरी भागात रपेट मारण्यासाठी या बाईकमध्ये 21-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर स्पोक व्हील देण्यात आले आहेत. V-Strom 800DE मध्ये राईड मोड्स, ग्रॅव्हल मोडसह ट्रॅक्शन कंट्रोल, राईड-बाय-वायर, बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर, ॲडजस्टेबल विंडस्क्रीन आणि लो RPM असिस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
  3. याशिवाय या बाईकमध्ये 5-इंचाची TFT स्क्रीन देण्यात आली आहे. V-Strom 800DE मध्ये 776cc पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. जो 83bhp आणि 78Nm आउटपुट जनरेट करते. यासह 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आले आहेत. भारतीय बाजारात या बाईकसमोरBMW F850 GS आणि ट्रायम्फ टायगर 900 चे आव्हान आहे.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.