Suzuki चा भारतीय बाजारात धुमाकूळ, मार्च महिन्यातील विक्रीत तब्बल 72 टक्क्यांची वाढ

सुझुकी मोटारसायकल इंडियाने त्यांचा मार्च 2021 चा सेल्स रिपोर्ट जारी केला आहे. कंपनीच्या विक्रीत यंदा वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Suzuki चा भारतीय बाजारात धुमाकूळ, मार्च महिन्यातील विक्रीत तब्बल 72 टक्क्यांची वाढ
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 8:39 AM

मुंबई : सुझुकी मोटारसायकल इंडियाने (Suzuki Motorcycle India) त्यांचा मार्च 2021 चा सेल्स रिपोर्ट जारी केला आहे. कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की मार्च 2021 मध्ये त्यांनी एकूण (देशांतर्गत बाजारातील विक्री + निर्यात) 69,942 दुचाकी विकल्या गेल्या. मार्च 2020 मध्ये सुझुकीने एकूण 40,636 दुचाकींची विक्री केली होती. म्हणजेच मार्च 2020 च्या तुलनेत मार्च 2021 मध्ये कंपनीच्या एकूण विक्रीत 72.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Suzuki Motorcycle India registered 72 percent sales growth in march 2021)

फेब्रुवारी 2021 मध्ये सुझुकीने 71,662 दुचाकींची (देशांतर्गत बाजारपेठ + निर्यात) विक्री केली होती. तर फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीने 67,961 दुचाकींची विक्री केली होती. म्हणजेच फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत फेब्रुवारी 2021 मध्ये 5.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती विक्री झाली?

मार्च 2021 मध्ये किती विक्री झाली मार्च 2020 मध्ये किती विक्री झाली होती? विक्री किती वाढली वाढलेली विक्री (%)
60,222 युनिट्स 33,930 युनिट्स 26,292 अधिक युनिट्सची विक्री 77.49 टक्क्यांची वाढ

गेल्या महिन्याच्या तुलनेत यंदा किती विक्री झाली?

मार्च 2021 मध्ये किती विक्री झाली फेब्रुवारी 2021 मध्ये किती विक्री झाली विक्री किती वाढली वाढलेली विक्री (%)
60,222 युनिट्स 59,530 युनिट्स 692 अधिक युनिट्सची विक्री 1.16 टक्क्याची वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारताबाहेर किती निर्यात केली?

मार्च 2021 मध्ये किती निर्यात केली मार्च 2020 मध्ये किती निर्यात केली होती विक्री किती वाढली वाढलेली विक्री (%)
9,720 युनिट्स 6,706 युनिट्स 3,014 अधिक युनिट्सची विक्री 44.94 टक्क्याची वाढ

Bajaj Auto चा जलवा कायम

अलीकडेच ऑटो कंपन्यांनी मार्च महिन्यातील विक्रीचे आकडे शेअर केले आहेत, त्यावरुन स्पष्ट होतंय की, मार्च महिना ऑटो कंपन्यांसाठी खूप चांगला होता. वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) मार्च महिन्यात एकूण 3,69,448 वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी कोव्हिड-19 च्या विघ्नादरम्यानही कंपनीने (मार्च 2020) 2,42,575 युनिट्स वाहनांची विक्री केली होती.

बजाज ऑटोने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने देशांतर्गत बाजारात गेल्या महिन्यात 1,98,551 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात देशांतर्गत बाजारात 1,16,541 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. मार्च 2020 मध्ये कंपनीने 2,10,976 दुचाकी वाहनांची विक्री केली होती. तर एकूण 39,315 युनिट्स व्यावसायिक वाहनांची विक्री केली होती.

बजाज ऑटोने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात त्यांनी एकूण 1,70,897 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीने 1,26,034 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीने 39,72,914 वाहनांची विक्री केली होती. तर 2019-20 मध्ये कंपनीने 46,15,212 वाहनांची विक्री केली होती. यामध्ये तब्बल 14 टक्क्यांची घट झाली होती. दरम्यान, कंपनीने देशांतर्गत बाजारात 2019-20 च्या 24,44,107 युनिट्स वाहनांच्या विक्रीत 21 टक्क्यांची घट होऊन 19,18,667 वाहनांची विक्री कंपनीने केली आहे.

टीव्हीएसकडूनही जोरदार विक्री

बजाज ऑटो व्यतिरिक्त टीव्हीएस मोटर कंपनीने मार्चमध्ये एकूण 3,22,683 वाहनांची विक्री केली आहे. मार्च 2020 मध्ये कोविड -19 मुळे लॉकडाऊन लादण्यात आले, तेव्हा कंपनीने 1,44,739 वाहनांची विक्री केली होती. टीव्हीएस मोटरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मार्च 2021 मध्ये कंपनीने एकूण 3,07,437 युनिट्स इतक्या दुचाकींची विक्री केली आहे. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,33,988 युनिट्स दुचाकींची विक्री केली होते. गेल्या महिन्यात देशांतर्गत दुचाकींची विक्री 2,02,155 युनिट्स इतकी होती. मार्च 2020 मध्ये ही आकडेवारी 94,103 वाहनं इतकी होती.

मार्च 2020 मध्ये कंपनीने 66,673 युनिट्स स्कूटर्सची विक्री केली होती. तर गेल्या महिन्यात (मार्च 2021 मध्ये कंपनीने 1,04,513 युनिट्स स्कूटरची विक्री केली आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने एकूण 1,19,422 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे. तर मार्च 2020 मध्ये कंपनीने केवळ 50,197 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. कंपनीने गेल्या महिन्यात केलेल्या एकूण निर्यातीपैकी 1,05,282 युनिट्स दुचाकी वाहनं आहेत. मार्च 2020 मध्ये हीच आकडेवारी 39,885 युनिट्स इतकी होती.

इतर बातम्या

‘या’ 5 गाड्यांचा भारतीय बाजारात बोलबाला, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 1.95 लाखात

परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.