दिल्ली सरकारचा मास्टर प्लॅन, ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची बचत होणार

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे.

दिल्ली सरकारचा मास्टर प्लॅन, ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची बचत होणार
electric scooter
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 1:43 PM

दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत. तसेच यापूर्वीदेखील देशात काही इलेक्ट्रिक वाहनं लाँच झाली आहेत. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं, प्रामुख्याने ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापराव्यात, यासाठी दिल्ली सरकारने पुढाकार घेतला आहे. (Switching to e-two-wheelers can save 22,000 rupees a year: Delhi transport minister)

दिल्लीचे परिवहन मंत्री कैशाल गहलोत यांनी रविवारी ‘स्विच दिल्ली अभियाना’च्या पहिल्या सप्ताहाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही ट्विट्स केले. त्यात त्यांनी म्हटलं की, तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केलीत तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी 22,000 रुपयांची बचत करु शकता. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी 20,000 हजार रुपयांची बचत करु शकता. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल.

गहलोत यांनी अजून एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की, “टू-व्हीलर सेगमेंटसह आम्ही ‘स्विच दिल्ली अभियाना’ची सुरुवात करत आहोत. ग्राहकांना होणाऱ्या आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त महत्त्वपूर्ण पर्यावरणीय लाभांचादेखील यामध्ये समावेश आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या एका दुचाकी वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सरासरी 1.98 टन कमी कार्बन उत्सर्जन करेल. 11 झाडं लावल्यानंतरच हे शक्य होतं.” यायाच अर्थ तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल तर 11 झाडं लावल्यानंतर पर्यावरणाचा जितका फायदा होतो, तितकी पर्यावरणाची मदत तुम्ही करु शकाल

दिल्लीत 500 चार्जर पॉईंट उभारणार

दिल्ली सरकारने देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्‍हीकल (ईव्ही) चार्जिंगसाठीचं टेंडर जारी केलं आहे (निविदा काढल्या आहेत). ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, दिल्ली सरकारकडून देशातील सर्वात मोठ्या ईव्ही चार्जिंगसाठीचं टेंडर कारण्यात आलं आहे. याद्वारे दिल्लीत 100 ठिकाणी तब्बल 500 चार्जर पॉईंट उभारले जाणार आहेत. त्यासाठी नाममात्र शुल्क भरावं लागणार आहे. चार्जिंगसाठी 4 किंवा 5 रुपये प्रति युनिट शुल्क आकारलं जाईल.

अवघ्या 50 मिनिटात चार्ज होणारी MG Motors ची शानदार कार आज लाँच होणार

MG Motor ने त्यांची नवीन अपग्रेडेड मिड साईज एसयूवी MG ZS EV भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 5 फेब्रुवारीला याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, अपग्रेडेड MG ZS EV भारतीय बाजारात 8 फेब्रुवारीला (आज) रोजी लाँच केली जाणार आहे. कंपनीने नवीन MG ZS EV या कारबात सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु असं म्हटलं जातंय की, MG ZS EV च्या नवीन वर्जनमध्ये कारच्या इंटीरियर आणि इक्स्टीरीअर फीचर्समध्ये बदल केला जाऊ शकतो. कंपनीने दावा केला आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 340 किलोमीटरपर्यंत धावेल.

भारतात किंमत कमी असणार

MG Motor ने यापूर्वी भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूवी MG ZS लाँच केली होती. या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले होते की, या कारमध्ये बसविलेली बॅटरी भारतात तयार केली जाईल जेणेकरून कारची किंमत कमी ठेवता येईल. त्यामुळे असं म्हटलं जातंय की भारतीय मार्केटमध्ये या कारची किंमत कमी असेल.

‘हे’ फीचर्स असणार

नवीन 2021 MG ZS इलेक्ट्रिक कारमध्ये इमरजन्सी ब्रेकिंग सिस्टिम दिली जाऊ शकते. हे फीचर यापूर्वी MG च्या ग्लॉस्टर या एसयूव्हीमध्ये पाहायला मिळालं होतं. या SUV मध्ये ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम) ही सिस्टिम दिली जाऊ शकते. ज्यामध्ये ब्लाईंड स्पॉट मॉनिटरिंग आणि अडॅप्टिव्ह क्रुझ कंट्रोलसारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. असं म्हटलं जातंय की, ZS EV मध्ये मोठा बॅटरी बॅकअप असेल, त्यामुळे सिंगल चार्जवर ही कार 400km हून अधिकची रेंज देऊ शकेल. दरम्यान, असा दावा केला जातोय की, ही कार अवघ्या 50 मिनिटात चार्ज होऊ शकते.

सध्याच्या MG ZS EV मधील फीचर्स

ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा

Special Story : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स

(Switching to e-two-wheelers can save 22,000 rupees a year: Delhi transport minister)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.