Tata Altroz भारतीय बाजारात धुमाकूळ, विक्रीत तब्बल 558 टक्क्यांची वाढ

टाटा मोटर्सने आपली प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोजच्या 7550 युनिट्सची विक्री केली आहे. (Tata altroz preferred by Indian consumers)

Tata Altroz भारतीय बाजारात धुमाकूळ, विक्रीत तब्बल 558 टक्क्यांची वाढ
Tata Altroz
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 11:28 AM

मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) आपली प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोजच्या (Tata Altroz) 7550 युनिट्सची विक्री केली आहे. हा सेल कंपनीने मार्च 2021 मध्ये साध्य केला आहे. गेल्या वर्षातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास मार्च 2020 मध्ये कंपनीने अल्ट्रोजच्या 1147 युनिट्सची विक्री केली होती. याचाच अर्थ कंपनीने यंदा अल्ट्रोजच्या विक्रीत तब्बल 558 टक्के वाढ साध्य केली आहे. ही वाढ इतर कोणत्याही टॉप 25 कारपेक्षा अधिक आहे आणि तीही मार्च महिन्यात. मासिक विक्रीचा विचार केला तर टाटाने एकूण 11 टक्के वाढ साध्य केली आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात 6,832 युनिट्सची विक्री नोंदवली होती. (Tata Altroz’s sales increases 558 percent in March 2021)

अल्ट्रोज ही एक दमदार कार आहे. या कारमध्ये, आपल्याला प्रीमियम क्वालिटीचे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. गाडीची केबिन स्पेस बऱ्यापैकी मोठी आहे. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेले प्रवासी सहज आपले पाय पसरवून बसू शकतात. ही एक आधुनिक कार आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारला सुरक्षेच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

टाटाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात ही लाँच केली होती. काही आठवड्यांतच ही कार लोकांच्या पसंतीस उतरली. परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे या कारची विक्री मंदावली होती. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत या कारने विक्रमी आकडेवारी नोंदवली असून भारतीय ग्राहकांमध्ये अल्पावधित लोकप्रियता मिळवली आहे. प्रीमियम लुकबरोबरच तुम्हाला या कारमध्ये एक मजबूत इंजिन देखील मिळेल.

Tata Altroz चे फीचर्स आणि इंजिन

कंपनी ही कार 7 व्हेरिएंट आणि तीन इंजिन ऑप्शन्समध्ये देत आहे. यात पहिले 1.2 लीटरचे नॅचरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिन आहे जे 86ps पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरे 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे 110ps पॉवर आणि 140Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय तुम्हाला तिसरे 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल जे 90ps पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करेल. या व्यतिरिक्त तुम्हाला या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.

या कारची किंमत 5.69 लाख ते 9.45 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एम्बियंट लायटिंग, स्टीयरिंग माउंट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, 4 एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, रियर पार्किंग सेन्सर आणि स्पीड अ‍ॅलर्ट सिस्टम असे फीचर्स मिळतील.

इतर बातम्या

बंपर ऑफर! Maruti Suzuki Swift वर कंपनीकडून 54000 रुपयांचा डिस्काऊंट

बंपर ऑफर! Maruti Suzuki Swift वर कंपनीकडून 54000 रुपयांचा डिस्काऊंट

(Tata Altroz’s sales increases 558 percent in March 2021)

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.