Tata Motors Car : ऑटो एक्सपोमध्ये टाटाचा जलवा, एकाच वेळी लॉंच केल्या 5 कार, लूक असा की पाहतच रहाल

Tata Motors Car : ऑटो एक्सपोमध्ये टाटाने धमाल उडवून दिली. कारचा लूक सर्वांनाच वेड लावणारा आहे.

Tata Motors Car : ऑटो एक्सपोमध्ये टाटाचा जलवा, एकाच वेळी लॉंच केल्या 5 कार, लूक असा की पाहतच रहाल
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 9:23 PM

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये (Auto Expo 2023) टाटा कंपनीने धमाल उडवून दिली. मारुतीपासून ते हुंदाईपर्यंत सगळ्यांनीच त्यांच्या नवीन कारची झलक दिसली. पण आज एक्सपोमध्ये टाटाने धमाका केला. मारुतीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार आणली तर हुंदाईने त्यांची Ioniq 5 इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. तर टाटा मोटर्सने (Tata Motors) सर्वांनाच धक्का देत, एकाचवेळी 5 कार सादर केल्या. या कारमध्ये इलेक्ट्रिकपासून ते सीएनजी आणि पेट्रोल कार आहे. या कारची वैशिष्ट्ये पाहुयात.

टाटाने त्यांची गाजलेली एसयुव्ही, हॅरिअर इलेक्ट्रिक रुपात (Tata Harrier EV) लॉन्च केली. ही कार जवळपास ICE इंजिन असलेल्या हॅरिअरसारखीच आहे. या ईव्हीमद्ये क्लिअर लाईन्स आणि क्लोज्ड ग्रिल फ्युचरिस्टिक लूक देतो.

या कारमध्ये पुढील भागात नवीन स्प्लिट हेडलँप सेट-अप देण्यात आला आहे. साईड प्रोफाईल हुबेहुब हॅरिअरसारखाच असतो. तर टेललॅपमध्ये काही अपडेट करण्यात आला आहे. त्याच्या डिझाईनमध्ये थोडाफार बदल करण्यात आल्याने त्याला एक लूक आला आहे.

हे सुद्धा वाचा

हे एक AWD व्हेईकल आहे. ड्युअल-मोटार सेटअपसह ते येते. Gen 2 ईवी आर्किटेक्चरवर ही कार आधारीत आहे. Gen 1 व्हर्जनपेक्षा ही कार जोरदार आणि आधुनिक फिचरसह येते.  या कारमध्ये आधुनिक फिचर्सचा उपयोग करण्यात आला आहे.

टाटा मोटर्सची सिएरा ही पण एक इलेक्ट्रिक व्हेईकल (Tata Sierra EV) आहे. सिएरा ईव्हीला अपडेट करण्यात आले आहे. या कारला पाच डोअर आहे. सिएरा ईव्ही पूर्णता बंद ग्रिल आणि मोठ्या बम्परसह येते. याच्या दोन्ही बाजूला हेडलॅम्प क्रोम स्ट्राईप आहेत. या कारमध्ये सी आणि डी पिलर ब्लॅक आऊट आहेत.

टाटा कर्व्ह (Tata Curvv) ही पहिल्यांदा इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणून समोर आली आहे. आता ही कार टर्बो-पेट्रोल पॉवरट्रेन वर आधारीत असेल. 2024 मध्ये ही कार भारतीय बाजारात दाखल होईल. या कारमध्ये लेअर्ड डॅशबोर्ड, मल्टिपल स्क्रीन आणि शार्प डिझाईन आहे.

टाटाने न्यू अविन्या (Tata Avinya) ही लॉन्च केली. ही कार Gen3 वर आधारीत आहे. ही कार इलेक्ट्रिकमध्ये कमीत कमी 500 किमीचा पल्ला गाठेल. टाटाच्या दाव्यानुसार ही कार 2025 मध्ये बाजारात दाखल होईल.

टाटाची लोकप्रिय पंच अल्ट्रोज (Punch-Altroz CNG) या एसयुव्हीचे सीएनजी व्हर्जन सादर करण्यात आले आहे. कंपनीने अल्ट्रोज सीएनजी आणि पंच सीएनजीच्या लॉन्चची माहिती देण्यात आली नाही. अल्ट्रोज सीएनजी 1.2L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह आणण्यात येणार आहे. तर पंच सीएनजीमध्ये 1.2L 3- सिलेंडर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन असेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.