Marathi News Automobile Tata Maruti Mahindra upcoming cars will get petrol and electric options know everything about it
टाटासह मारुती, महिंद्राच्या या गाड्यांमध्ये मिळणार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पर्याय, जाणून घ्या सर्वकाही
भारतीय बाजारात लवकरच पाच नव्या गाड्या लाँच केल्या जाणार आहेत. या गाड्यांमध्ये आयसीई आणि इव्ही पॉवरट्रेन असे पर्याय असतील. या गाड्यांवर ह्युंदाई, मारुती आणि टाटासारख्या कंपन्या काम करत आहेत. चला जाणून घेऊयात
1 / 5
Tata Curvv EV: टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट एसयुव्ही मागच्या वर्षी सादर करण्यात आली होती. तेव्हापासून या गाडीची जोरदार चर्चा आहे. कॉन्सेप्ट सादर केल्यानंतर या गाडीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही नवी इव्ही आयसीई आणि ऑल इलेक्ट्रिक पॉवरट्रेन या दोन्ही पर्यांयासह येईल. या गाडीच्या ऑल इलेक्ट्रि व्हेरियंटमध्ये दोन बॅटरी पॅकचा पर्याय असण्याची शक्यता आहे. (फोटो- TATA)
2 / 5
Hyundai Creta EV: ही गाडी 1.5L NA पेट्रोल, 1.5L टर्बो डिझेल आणि 1.4L टर्बो पेट्रोलसह सादर केली जाणार आहे. लवकरच ही गाडी भारतात लाँच केली जाईल. ही गाडी महिंद्र एक्सयुव्ही 400 इव्ही, टाटा नेक्सन इव्ही आणि एमजी झेडएस इव्ही गाड्यांशी स्पर्धा करेल. (फोटो: Hyundai)
3 / 5
Mahindra XUV e8: ही गाडी 2024 च्या मध्यापर्यंत विक्री केली जाण्याची शक्यता आहे.ही गाडी नव्या INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या एसयुव्हीमध्ये 60 किलोवॅट आणि 80 किलोवॅट असे पर्याय असण्याची शक्यता आहे. यासोबत सिंगल मोटरसह ड्युअल मोटर सेटअपसह सादर केली जाऊ शकते. महिंद्राची लाँच होणारी ही पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही असेल. (फोटो: Mahindra)
4 / 5
Maruti Jimny EV: मारुती जिम्नी इव्ही लवकरच भारतात लाँच केली जाणार आहे. ही देशातील पहिली ऑफ रोड कार्सपैकी एक असेल. ही गाडी ऑल इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर केली जाईल. जिम्नी इव्हीच्या स्टँडर्स स्ट्रक्चरमध्ये 4WD सेटअपसह बॉडी ऑन फ्रेम आर्किटेक्चरसह येईल. जिम्नीला 1.5L NA पेट्रोल इंजिनसह सादर केलं जाण्याची शक्यता आहे. (फोटो- Maruti)
5 / 5
Tata Harrier EV: हॅरियर एसयुव्ही ब्राँडच्या लाइनअपमधील फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे.लवकरच या गाडीत काही अपडेट पाहायला मिळतील. नुकतंच या गाडीचं मॉडेल ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर करण्यात आलं होतं. हॅरियर एसयुव्हीमध्ये इलेक्ट्रिक व्हेरियंटसह एक ड्युअल मोटर सेटअप असण्याची शक्यता आहे. (फोटो: Tata)