Auto News : टाटा मोटर्सचा ‘कार’नामा, 25 वर्षात कंपनीने गाठली इतकी उंची

टाटा मोटर्सच्या गाड्यांवर ग्राहकांचा विश्वास आणखी दृढ होत चालला आहे. कारण गेल्या 25 वर्षात ग्राहकांची कंपनीच्या गाड्यांना पसंती दिली आहे. कंपनीने आता नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Auto News : टाटा मोटर्सचा 'कार'नामा, 25 वर्षात कंपनीने गाठली इतकी उंची
टाटा मोटर्सचा आणखी एक विक्रम, कंपनीच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 6:16 PM

मुंबई : देशातील प्रमुख वाहन निर्मात कंपनी टाटा मोटर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कंपनीने याबाबतची माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे टाटा समुहाचे संस्थापक जमसशेदजी टाटा यांचा 183 वा जन्मदिवस आणि दुसरीकडे कंपनी 25 लाख प्रवासी वाहनं तयार करण्याचा विक्रम नोंदवला आहे. कंपनीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत कंपनीने 50 लाख गाड्यांची निर्मिती केली आहे. हा आनंद कंपनीने अनोख्या पद्धतीने साजरा केला. टाटा मोटर्सने 1977 साली पहिलं कमर्शिअल वाहन रोलआउट केलं होतं. त्यानंतर पॅसेंजर व्हेइकल असलेली टाटा इंडिया 1998 साली बाजारात लाँच केली. यानंतर कंपनीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

टाटा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गाड्यांच्या मदतीने ’50 लाख’ असं लिहीलं आणि कामगिरीची झलक दाखवली. टाटा मोटर्सने इतकी उंची गाठल्यानंतर कंपनीचे अधिकारी शैलेश चंद्रा यांनी सांगितलं की, “आज मोटर्सच्या इतिहासात हा आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही आजपर्यंत 50 गाड्यांची निर्मिती केली आहे. हा आमच्या कामगिरीतील एक मैलाचा दगड आहे.”

टाटा मोटर्सनं 2004 साली 10 लाख पॅसेंजर व्हेईकल निर्मितीचा आकडा गाठला होता. त्यानंतर 2010 मध्ये 20 लाख, 2015 मध्ये 30 लाखांचा टप्पा गाठला होता. 2020 मध्ये कोरोनाची लाट असताना कंपनीने 40 लाखवी कार लाँच केली होती. त्यानंतर आता तीन वर्षात आणखी 10 गाड्यांची निर्मिती करून 50 लाखांचा टप्पा गाठला आहे.

टाटा मोटर्सने आतापर्यंत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक मॉडेल सादर केले आहेत. यात टाटा सफारी, टाटा सूमो, टाटा इंडिगो, टाटा हॅरियर, टाटा पंच आणि टाटा नेक्सॉन या गाड्यांचा समावेश आहे. टाटा मोटर्सच्या गाड्यांची मागणी गेल्या काही दिवसात वाढतच चालली आहे. टाटाने नेक्सन, हॅरियर आणि सफारी एसयुव्हीची रेड डार्क एडिशन लाँच केली आहे. नेक्सन रेड डार्क एडिशनमध्ये पेट्रोल आणि डिझेल एडिशनमध्ये आहे.

कंपनीने मागच्या महिन्यातील विक्रीत 3 टक्क्यांची वाढ केली आहे. टाटा मोटर्सने 79,705 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी हीच विक्री 77,733 युनिट्सची विक्री केली होती.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.