Tata Motors चं ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवली
टाटा मोटर्सने (Tata Motors) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत.
मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (Tata Motors extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)
कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
टाटा मोटर्सच्या कस्टमर केअर हेड डिंपल मेहता यांनी जाहीर केले की, कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं आहे. अशा परिस्थितीत सध्या कोणताही ग्राहक त्यांच्या कारच्या सर्व्हिस आणि दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती ज्या ग्राहकांची सर्व्हिस आणि वॉरंटी अद्याप प्रलंबित आहे अशा ग्राहकांसमोर आव्हान उभे आहे.
Maruti ने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली
मारुती सुझुकीने बुधवारी जाहीर केले की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 15 मार्च ते 31 मे दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Tata च्या गाड्यांवर 65000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी संचारबंधी किंवा लॉकडाऊन लावण्यासारखे निर्णय प्रशासनाने घेतले आहेत. याचा सर्वच व्यवसायांवर परिणाम होऊ लागला आहे. वाहन उद्योगावरही (Automobile Industry) त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. देशातील सर्वच वाहन कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. दरम्यान, विक्री कमी होत असतानाही टाटा मोटर्सने (Tata Motors) यावेळी आपल्या ब्रँडच्या मोटारींवर अनेक ऑफर सादर केल्या आहेत. रोख सवलतींव्यतिरिक्त एक्सचेंज बोनस ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. विक्री वाढवण्यासाठी टाटा मोटर्स मे महिन्यात वेगवेगळ्या कार्सवर 65 हजार रुपयांपर्यंतची सवलत देत आहे.
टाटा मोटर्सने मे 2021 मध्ये Harrier, Tigor, Tiago , Nexon आणि Nexon EV या गाड्यांवर डिस्काउंट देऊ केला आहे. ऑटोकाराच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार टाटा हॅरियरवर 65 हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. Nexon इलेक्ट्रिक कारवर 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर करण्यात आला आहे. Tata Tigor वर 30 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. दरम्यान, कंपनीने या महिन्यात त्यांच्या लोकप्रिय आणि सध्या बाजारात धुमाकूळ घालत असलेल्या Altroz आणि Safari या कार्सवर कोणतीही सवलत दिलेली नाही.
इतर बातम्या
ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?
Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय
Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार
(Tata Motors extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)