पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर Tata Motors चा जालीम उपाय, ग्राहकांना दिलासा देणारी घोषणा
टाटा मोटर्सने (Tata Motors) आर्थिक वर्ष 2022 मध्ये सीएनजी फ्युएल प्रवासी वाहन विभागात प्रवेश करण्याची योजना आखली आहे.
मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्सने ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) आर्थिक वर्ष 2022 मध्ये सीएनजी फ्युएल प्रवासी वाहन विभागात प्रवेश करण्याची योजना आखली आहे. (Tata Motors going to launch CNG powered cars in 2022)
टाटा मोटर्सच्या काही मॉडेल्समध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देण्यात येणार आहे. सध्या, टाटा मोटर्स कंपनी आपल्या काही पीव्हीमध्ये (Passenger Vehicle) डीलरशिपवर सीएनजी किट मिळवण्याचा पर्याय देते. बाजारात सीएनजी वाहनांची आवक वाढणे आवश्यक झाले आहे, कारण अलीकडेच पेट्रोलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितले की चालू आर्थिक वर्षात काही मॉडेल्सचे फॅक्टरी फिटेड सीएनजी पर्याय सादर केले जातील.
फॅक्टरी फिटेड सीएनजी पर्याय
शैलेश चंद्र म्हणाले की, “सध्या आमच्याकडे ग्राहकांसाठी आयसीई आणि ईव्ही पर्यायांसह विस्तृत पीव्ही पोर्टफोलिओ आहे. आमच्या ग्राहकांकडे डीलरशिपवर सीएनजी किट मिळण्याचा पर्यायदेखील आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये आमच्या ग्राहकांना फॅक्टरी फिटेड सीएनजी पर्यायही मिळेल, जो आमच्या अनेक मॉडेल्सवर उपलब्ध असेल.
वाहनांची मागणी वाढणार
शैलेश चंद्र म्हणाले की, कोव्हिड -19 या साथीच्या आजारामुळे मर्यादित सार्वजनिक वाहतूक वाहतूक पर्यायांमुळे प्रवास करणे सध्या चिंताजनक आहे. त्याचबरोबर, यामुळे लोकांचं खासगी वाहतुकीवर अवलंबून राहणं वाढणार आहे, ज्यामुळे वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
कंपनीनी नवी रणनीती
कंपनीच्या पीव्ही (Passenger Vehicle) व्यवसायाने मार्च 2021 आणि Q4FY21 मध्ये गेल्या नऊ वर्षात सर्वाधिक विक्री केली आहे. त्याचबरोबर, आर्थिक वर्ष 2021 मध्ये, व्यवसायात गेल्या 8 वर्षात सर्वात जास्त म्हणजेच जवळजवळ 69 टक्क्यांची वाढ झाली आहे. शैलेश चंद्र म्हणाले की, कोरोना महामारीमुळे कंपनीचे नुकसान झाले खरे, परंतु मागील काही महिन्यांमध्ये विक्रीच्या मदतीने आम्ही त्याची भरपाई केली आहे. अशा परिस्थितीत या वेळी आम्ही थोडी वेगळी रणनीती आखली आहे.
इतर बातम्या
Swift, WagonR, ते Vitara Brezza, मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर जबरदस्त डिस्काऊंट
Tigor पासून Harrier पर्यंत, Tata ‘या’ गाड्यांवर 65000 रुपयांची सूट
(Tata Motors going to launch CNG powered cars in 2022)