Auto News | थोडी घाई करा, 3 दिवसानंतर महाग होणार ‘या’ गाड्या, 9 कंपन्या वाढवणार किंमत

| Updated on: Dec 29, 2023 | 10:45 AM

Auto News | 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी आपल्या कार्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लिस्टमध्ये लग्जरी कार्स सुद्धा आहेत. येत्या 1 जानेवारीपासून कुठल्या कार्सचे दर वाढणार त्या बद्दल जाणून घ्या.

Auto News | थोडी घाई करा, 3 दिवसानंतर महाग होणार या गाड्या, 9 कंपन्या वाढवणार किंमत
Auto news
Follow us on

Auto News | वर्ष 2023 संपायला आता काही तास शिल्लक आहेत. 3 दिवसांनी नव्या वर्षाची सुरुवात होईल. नव्या वर्षाची सुरुवात होताना देशात काही बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लग्जरी कार्स सुद्धा या लिस्टमध्ये आहेत. 1 जानेवारीपासून कुठल्या कार कंपन्या रेट वाढवणार त्या बद्दल जाणून घ्या.

होंडा कार्स इंडिया नव्या वर्षात जानेवारी 2023 मध्ये गाड्याच्या किंमती वाढवणार आहे. इनुपट खर्चामध्ये झालेली वाढ हे यामागे कारण असल्याच कंपनीने सांगितलं. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जापानी ऑटोमेकर आपल्या मॉडल्सच्या किंमतीमध्ये वाढ करणार आहे. कंपनीच्या कुठल्या मॉडलवर किती किंमत वाढवणार? त्या बद्दल हुंडई इंडियाने अजूनपर्यंत खुलासा केलेला नाही.

होंडा – अलीकडेच मायक्रो एसयूवी एलिवेटसह देशांतर्गत बाजारपेठेत सर्वाधिक कॉम्पिटिशनच्या सेगमेंटमध्ये एंट्री केलीय. सप्टेंबर महिन्यात 11 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्राइसला लॉन्चिंग केलं होतं. पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला या कार्सच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते.

टाटा – देशातील सर्वात भक्कम आणि मोठी कार कंपनी टाटा मोटर्सने आपल्या कमर्शियल गाड्यांच्या किंमतीमध्ये 3 टक्क्यापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.

मारुती – कार उत्पादनाचा खर्च वाढल्याने मारुतीने सुद्धा आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नॉर्मल कार्सच्या किंमतीमध्ये 2-3 परसेंट वाढ होऊ शकते. लग्जरी सेगमेंटच्या कार्सच्या किंमतीमध्ये यापेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.

ऑडी – लग्जरी कार कंपन्यांबद्दल बोलायच झाल्यास ऑडी नव्या वर्षात आपल्या कार्सच्या किंमती वाढवणार आहे. ऑडीने 2 परसेंट किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

मर्सिडीज – ऑडीशिवाय मर्सिडीजने नव्या वर्षात कार्सच्या किंमतीमध्ये 2 टक्क्यापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन वर्ष म्हणजे 1 जानेवारीपासून नवीन दर लागू होतील.

महिंद्रा – SUV बनवणाऱ्या महिंद्रा एंड महिंद्रा कंपनीने सुद्धा कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. नवीन वर्ष 1 जानेवारीपासून नवीन दर लागू होतील, असं कंपनीने सांगितलय. तुम्ही महिंद्रा स्कार्पियोचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.

टोयोटाने भारतात 1 जानेवारीपासून आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. किती प्रमाणात किंमती वाढवणार ते अजून कंपनीने स्पष्ट केलेलं नाही.

MG मोटर्सच्या कार्सच्या किंमतीमध्ये सुद्धा पुढच्यावर्षीपासून वाढ होईल. या गाड्या सुद्ध महाग होतील. स्टील महागल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने कार्सच्या किंमती वाढणार आहेत.