पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त, Tata Motors उद्या दोन नवीन CNG कार लाँच करणार
टाटा मोटर्सने (Tata Motors) उद्या (19 जानेवारी) एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमादरम्यान, कंपनी दोन हॅचबॅक कार सादर करू शकते, ज्यामुळे लोक महागड्या पेट्रोलच्या किंमतीपासून सुटका मिळवू शकतील.
1 / 5

2 / 5
या कार्यक्रमादरम्यान, कंपनी CNG व्ह्रेरिएंटमध्ये Tata Tigor आणि Tata Tiago या दोन लाँच करू शकते, या दोन्ही कार्सचे पेट्रोल व्हेरिएंट आधीच बाजारात आहेत.
3 / 5
Tata Motors च्या या आगामी CNG कार बाजारात मारुती सुझुकी आणि Hyundai च्या CNG हॅचबॅक कार्सना टक्कर देतील. Tata Tiago आणि Tigor चे CNG व्हेरियंटमधील इतर सर्व स्पेसिफिकेशन्स जुन्या कारप्रमाणेच आहेत.
4 / 5
Tata Tiago आणि Tata Tigor मध्ये 2 लीटर Revotron पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यात पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कार 85 Bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करू शकते. तथापि, सीएनजी व्हेरिएंटच्या पॉवरमध्ये थोडासा फरक असू शकतो.
5 / 5
टाटाच्या या गाड्या मारुती सुझुकीच्या अल्टो, वॅगनआर, सेलेरियो यांसारख्या लोकप्रिय गाड्यांशी स्पर्धा करतील. टाटा मोटर्सच्या एंट्री सेगमेंटमध्ये सीएनजी कारचा मोठा फायदा होऊ शकतो.