Tata Electric SUV: फ्यूचर डिझाईनसह टाटाची EV सज्ज, कारमध्ये मोठी बॅटरी आणि लाँग ड्रायव्हिंग रेंज मिळणार

Tata Electric SUV Car: टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतीय वाहन उत्पादक कंपनीने अलीकडेच त्यांची मध्यम आकाराची (मिड साईज) एसयूव्ही कार (SUV car) टाटा कर्व्ह (Tata Curvv) सादर केली होती.

Tata Electric SUV: फ्यूचर डिझाईनसह टाटाची EV सज्ज, कारमध्ये मोठी बॅटरी आणि लाँग ड्रायव्हिंग रेंज मिळणार
Tata Curvv Electric SUV
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:10 PM

Tata Electric SUV Car: टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतीय वाहन उत्पादक कंपनीने अलीकडेच त्यांची मध्यम आकाराची (मिड साईज) एसयूव्ही कार (SUV car) टाटा कर्व्ह (Tata Curvv) सादर केली होती. कूप शैलीत येणारी ही मध्यम आकाराची एसयूव्ही कार आहे. ही कार पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये लाँच केली जाईल. मात्र, फायनल व्हर्जन आणि कॉन्सेप्ट व्हर्जनमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील, असा दावा काही वेबसाइट्सवर करण्यात आला आहे. कंपनीने या कॉन्सेप्ट कारचे तपशीलवार वर्णन केले असले तरी, कदाचित फाईन व्हर्जनमध्ये कंपनी त्यांचं डिझाईन मेन्टेन करण्याचा प्रयत्न करेल.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, “ही कार इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा अधिक चांगली बनवण्यात आली आहे. तसेच यात जनरेशन 2 आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे. अशी अपेक्षा आहे की, या कारला मोठा बॅटरी बॅकअप मिळेल, ज्याच्या मदतीने चांगली ड्रायव्हिंग रेंज उपलब्ध होईल. टाटाच्याच Nexon EV च्या तुलनेत या कारला उत्तम ड्रायव्हिंग रेंज मिळेल.”

Tata Nexon पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज

टाटा कर्वमध्ये बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटरचा वेग टाटा नेक्सॉनपेक्षा खूप जास्त असेल. लीक्स रिपोर्टनुसार, टाटा नेक्सॉनचं अपडेटेड व्हर्जन लवकरच लाँच केलं जाईल. या अपडेटेड व्हर्जनमध्ये ग्राहकांना 40 kWh बॅटरी मिळेल, जी सिंगल चार्जवर चांगली ड्रायव्हिंग रेंज देईल, तर सध्याच्या मॉडेलमध्ये 30.2 kWh बॅटरी देण्यात आली आहे.

पेट्रोल इंजिन व्हर्जनही लाँच होणार

टाटा कर्वमध्ये IC इंजिन व्हर्जनदेखील सादर केलं जाईल, परंतु कंपनी आधी इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. कदाचित यात 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल आणि 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देखील मिळेल. पेट्रोल व्हर्जन चार सिलिंडरचे असेल, तर टर्बो पेट्रोल इंजिन तीन सिलिंडरचे असेल. हे इंजिन 160 पीएस पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल.

Tata Curve मध्ये मारुती बलेनो सारखा डिस्प्ले दिसेल

टाटा कर्व्ह कारमध्ये हेडअप डिस्प्ले देण्यात आला आहे, जो नुकताच मारुती सुझुकी बलेनो 2022 मध्ये पाहायला मिळाला होता. कारमध्ये अतिशय आकर्षक आणि स्टायलिश डॅशबोर्ड आहे. कंपनी यामध्ये दोन हेड-अप डिस्प्ले वापरणार आहे, ज्यामध्ये एक इन्फोटेनमेंट सिस्टम आहे आणि दुसरा डिजिटल कन्सोल आहे, ज्यामध्ये स्पीड आणि बॅटरी लेव्हल इत्यादी तपासता येईल.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.