लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज

भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या आता डिझेल-पेट्रोल व्यतिरिक्त सीएनजी आणि इलेक्ट्रिक सारख्या पर्यायांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे डिझेल आणि पेट्रोल सारख्या पारंपारिक इंधनाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज
Tata Nexon (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:45 PM

मुंबई : भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या आता डिझेल-पेट्रोल व्यतिरिक्त सीएनजी आणि इलेक्ट्रिक सारख्या पर्यायांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे डिझेल आणि पेट्रोल सारख्या पारंपारिक इंधनाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ग्राहकांचा कलही हळूहळू इतर पर्यायांकडे वळत आहे. टाटा मोटर्सनेही (Tata Motors) अलीकडेच सीएनजी सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे आणि कंपनीने फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह टियागो (Tata Tiago) आणि टिगॉर (Tata Tigor) या दोन गाड्या लॉन्च केल्या आहेत. दरम्यान, टाटा मोटर्स कंपनी आता टियागो आणि टिगॉर नंतर CNG किटसह आपली सर्वात लोकप्रिय SUV Tata Nexon लाँच करण्याच्या तयारीत आहे. टाटा नेक्सॉन सीएनजीची चाचणी देखील सुरू झाली आहे आणि ही सीएनजी इंजिन असलेली नेक्सॉन अनेक वेळा पाहायला मिळाली आहे.

या संदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु असे मानले जात आहे की कंपनी या वर्षी सणासुदीच्या हंगामात ही नवीन कार लॉन्च करू शकते. कंपनी या कारच्या पेट्रोल हायब्रिड व्हर्जनवरही काम करत आहे.

विटारा ब्रेझा सीएनजी

मारुती सुझुकीचे सध्या सीएनजी सेगमेंटमध्ये वर्चस्व आहे. टाटाच्या प्रवेशापूर्वी फक्त मारुती आणि ह्युंडईने फॅक्टरी फिटेड सीएनजी असलेले मॉडेल्स विकले आहेत. या सेगमेंटमध्ये मारुती आणि ह्युंडईचं वर्चस्व आहे. आता या सेगमेंटमध्ये टाटाच्या एंट्रीनंतर स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मारुती आता विटारा ब्रेझा सीएनजी लाँच करण्याच्या तयारीत आहे. विटारा ब्रेझाचं सीएनजी (Vitara Brezza CNG) व्हेरिएंट या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च केले जाऊ शकते.

Tiago CNG Tigor CNG ची किंमत किती?

Tiago CNG चार स्ट्रिम्स आणि Tigor CNG दोन स्ट्रिम्स मध्ये बाजारात आणल्या आहेत. Tiago CNG ची एक्स-शोरुम किंमत 6.09 लाखांपासून 7.52 लाखांच्या दरम्यान आहे. तर Tigor CNG ची एक्स-शोरुम किंमतीला 7.69 लाख रुपयांपासून सुरुवात होते.

टाटा मोटर्सची ‘सीएनजी’त एन्ट्री

टाटा मोटर्सने  प्रदीर्घ काळानंतर सीएनजी सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये भागीदारीत वाढ करण्यासाठी कंपनीने TIGAO आणि TIGOR ला सीएनजी व्हेरियंटमध्ये सादर केले आहे. टाटा मोटर्सने सीएनजी गाड्यांमध्ये विशेष फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध सीएनजी गाड्यांवर वरचढ ठरण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला सीएनजी गाड्या खरेदीकडे कल वाढीस लागला आहे. मात्र, पेट्रोल व डिझेल गाड्यांच्या तुलनेत असलेल्या सीएनजीच्या कामगिरीबाबत सर्वत्र साशंकता व्यक्त केली जात आहे. टाटा मोटर्सच्या रिसर्च विंगने यावर मोठ्या प्रमाणात काम केले. टाटाच्या दोन्ही गाड्या पेट्रोल मोडवर शिफ्ट केल्याविना डोंगराळ तसेच घाट रस्ता सहज पार करू शकतात.

इतर बातम्या

Budget 2022: केंद्र सरकार EV चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करणार!

Maruti Ertiga ला टक्कर देणारी Kia ची नवी कार या महिन्यात लाँच होणार, काय असेल खास?

Kia ते Toyota, पाहा पुढील दोन महिन्यांत भारतात लाँच होणाऱ्या गाड्या

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.