मासिक विक्रीच्या बाबतीत टाटा नेक्सॉनने (Tata Nexon) नवा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या एकूण कार्सच्या तुलनेत सर्वाधिक नेक्सॉन कार विकल्या गेली आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीने 15 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारची ही सर्वाधिक विक्री आहे. भारतीय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने 2017 मध्ये त्यांची नवीन कार टाटा नेक्सॉन एसयुव्ही (Tata Nexon SUV) लाँच केली होती, त्यानंतर 2020 मध्ये तिचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर करण्यात आले आहे. भारतीय ऑटोमोबाईल कंपनीला गेल्या वर्षभरात चांगली लोकप्रियता मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात, Tata Nexon ने 15085 युनिट्सची विक्री केली आहे. ही विक्री कंपनीच्या एकूण विक्रीपैकी एक तृतीयांश आहे. टाटाने गेल्या महिन्यात 47166 मोटारींची विक्री केली. याशिवाय टाटा पंचने (Tata Punch) कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्येही चांगली विक्री केली आहे. ऑगस्ट महिन्यात टाटा पंचच्या 12000 युनिट्सची विक्री झाली आहे.
Tata Punch ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एयुव्ही कार आहे. याची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. टाटा मोटर्स अजूनही भारतातील तिसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. त्याआधी मारुती सुझुकी आणि ह्युंदाईचे नाव आहे.
टाटाचे नेक्सॉन मॉडेल आयसीई इंजिन आणि ईव्ही प्रकारात उपलब्ध आहे. अलीकडेच, कंपनीने Nexon EV Max देखील सादर केली आहे, त्यामध्ये उत्तम ड्रायव्हिंग रेंज मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा ने जेट एडिशनमध्ये नेक्सॉन, नेक्सॉन ईव्ही, स Aफारी आणि हॅरियर सादर केले होते.
ICE Nexon 1.2 लीटर रेव्होट्रॉन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनद्वारे सुसज्ज आहे. हे 120 पीएस पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याशिवाय 1.5 लीटर फॉल सिलेंडर रेवोटोर्क टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे 110 PS पॉवर आणि 260 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते.