मुंबई : भारतात 4 मीटरपर्यंतच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची खूप क्रेझ. जवळपास प्रत्येक देशी आणि परदेशी कार कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांची उत्पादनं बाजारात आणली आहे. पण, यामध्ये टाटा मोटर्सचं जे वर्चस्व दिसून येतंय. टाटा नेक्सॉन लोकांना खूप आवडते आहे. त्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं आकडे सांगतात. आता टाटा नेक्सॉनला (Tata Nexon) आव्हान देण्यासाठी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि ह्युंदाई मोटर्स (Hyundai Motors) सारख्या दोन सर्वात मोठ्या कार कंपन्या पुढील महिन्यात त्यांच्या भव्य SUV Brezza आणि Venue चे स्वरूप आणि नव्या फिचरसह बाजारात येणार आहे. होय, बातम्या येत आहेत की येत्या जूनमध्ये नेक्स्ट जनरेशन मारुती सुझुकी ब्रेझा आणि 2022 ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टची किंमत समोर येईल.
दीर्घकाळापासून ब्रेझा आणि व्हेन्यू फेसलिफ्टच्या अपडेटेड मॉडेल्सची भारतात चाचणी केली जात आहे. आता येणार्या काळात ती बाजारात येईलच. या दोन्ही कंपन्यांचे टार्गेट टाटा नेक्सॉन आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी टाटा नेक्सॉनला नेहमीच प्रशंसा मिळत असल्याचं आपण पाहिलंय. यामध्ये मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई व्हेन्यू मागे राहिले आहेत. माध्यमांच्या रिपोर्टनुसार हे उघड होतंय की पुढील पिढीच्या मारुती सुझुकी ब्रेझामध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांवर खूप भर दिला जाईल. मारुती सुझुकीची 5 स्टार सुरक्षा रेटिंग असलेली पहिली कार असू शकते. सध्या, आम्ही तुम्हाला नवीन ब्रेझा आणि व्हेन्यू फेसलिफ्टच्या लुकबद्दल आणि वैशिष्ट्यांबद्दल सांगत आहोत.
नवीन मारुती ब्रेझाच्या संभाव्य लुक आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत बरेच कॉस्मेटिक बदल दिसू शकतात. नवीन ब्रेझाला पुढचा आणि मागचा आक्रमक लुक, नवीन फ्रंट ग्रिल, नवीन ट्विन पॉड प्रोजेक्टर हेडलॅम्प, सुधारित बंपर, नवीन अलॉय व्हील आणि सर्व-नवीन इंटिरियर्ससह 360-डिग्री कॅमेरे, वायरलेस फोन चार्जिंग, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्ट आहे. इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि रिव्हर्स कॅमेरा यासह अनेक मानक आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत. त्याचवेळी इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाले तर त्यात नवीन 1.5 लीटर K15C पेट्रोल इंजिन दिसेल, जे 103 bhp पॉवर आणि 137 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. या एसयूव्हीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल तसेच 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पाहता येईल.