Tata New EV Car: टाटाची नवीन इलेक्ट्रिक SUV बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Tata New EV Car Launch 2022: टाटा मोटर्स (Tata Motors) ही भारतीय ऑटोमोबाईल कंपनी आज त्यांच्या ऑल न्यू इलेक्ट्रिक एसयूव्ही (All New SUV EV Car) कॉन्सेप्ट कारचे अनावरण करणार आहे. यासाठी कंपनीने एक टीझरही जारी केला आहे.

Tata New EV Car: टाटाची नवीन इलेक्ट्रिक SUV बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Tata Car
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 11:24 AM

Tata New EV Car Launch 2022: टाटा मोटर्स (Tata Motors) ही भारतीय ऑटोमोबाईल कंपनी आज त्यांच्या ऑल न्यू इलेक्ट्रिक एसयूव्ही (All New SUV EV Car) कॉन्सेप्ट कारचे अनावरण करणार आहे. यासाठी कंपनीने एक टीझरही जारी केला आहे. आतापर्यंतच्या लीक रिपोर्टनुसार, ही आगामी नेक्सॉन ईवी कूप कार (Tata Nexon EV coupe) असू शकते. याआधी अशी माहिती समोर आली होती की, भारतीय ऑटोमेकर कंपनी नेक्सॉनची एक मोठी आवृत्ती (व्हर्जन) लॉन्च करण्याचा विचार करत आहे, या कारची बॉडी कूप स्टाईल असू शकते. हे कॉन्सेप्ट कारचं इलेक्ट्रिक व्हर्जन असेल. कंपनी ही कार IC पॉवरट्रेनसह देखील सादर करु शकते, परंतु EV पॉवरट्रेन ही कंपनीची प्राथमिकता आहे.

टाटा कंपनीने आधी ठरवलं होतं की, ही कार फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 2022 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाईल. परंतु कोरोना संसर्गामुळे ऑटो एक्सपो कार्यक्रमाच्या तारखा वाढवण्यात आल्या. आता हा कार्यक्रम जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. अनेक वेबसाइट्सवर असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की ही कार 6 एप्रिल रोजी लाँच केली जाऊ शकते.

कार खरेदीसाठी वाट पाहावी लागू शकते

टाटा मोटर्स आज या कारवरील पडदा हटवणार आहे, परंतु ही कार बाजारात विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेक वेबसाइट्सवर असा दावा करण्यात आला आहे की, या लेटेस्ट कारची विक्री 2024 च्या पहिल्या तिमाहीपासून सुरू केली जाऊ शकते.

शार्प स्टाईल कार

कंपनीने जारी केलेल्या टीझरवरून या कारबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु एका गोष्टीची निश्चितपणे पुष्टी झाली आहे की ही एक शार्प स्टाईल कार असेल. या कारच्या समोरील बाजूस डीआरएल आणि चहुबाजूंनी एक लाईट स्ट्रिप असू शकते.

क्रेटाला टक्कर

Tata Nexon Coupe EV लाँच केल्यानंतर ही कार बाजारात क्रेटा किंवा अनेक मिड साईज SUV कार्सना टक्कर देईल. या गाड्या X1 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. Autocar वेबसाइटनुसार, या कारमध्ये 50 मिमीचा व्हीलबेस दिसेल. तसेच, या कारची लांबी 4.3 मीटर असेल.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.