TATA Nexon EV max : टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स 11 मेला होणार लाँच, एका चार्जिंगमध्ये 400 किमी धावणार
टाटा नेक्सॉन इव्ही सध्या अनेकांच्या पसंतीला उतरते आहे. याच मॉडेलचं अधिक रेंज देणारं मॉडेल टाटा नेक्सॉन इव्ही मॅक्स हे टाटाकडून 11 मेला लाँच करण्य़ात येणार आहे. टाटा नेक्सॉन इव्हीपेक्षा यात फिचर्स अपडेट करण्यात आले आहेत.
मुबंई : सध्या इलेक्ट्रिक कारमध्ये (Electric Car) सर्वाधिक विक्री होत असलेल्या टाटा मोटर्सची नवी कार लाँच होणार आहे. टाटाने बाजारात आणलेल्या टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच याला ग्राहकांची चांगली पसंती मिळते आहे. त्यातही टाटा नेक्सॉनची (Tata Nexon) इलेक्ट्रिक कार जास्त विकली जाते आहे. टाटा नेक्सॉन इव्ही (TATA Nexon EV) सध्या अनेकांच्या पसंतीला उतरते आहे. याच मॉडेलचं अधिक रेंज देणारं मॉडेल टाटा नेक्सॉन इव्ही मॅक्स हे टाटाकडून 11 मेला लाँच करण्य़ात येणार आहे. टाटा नेक्सॉन इव्हीपेक्षा यात फिचर्स अपडेट करण्यात आले आहेत. या नव्या कारच्या रेंजबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या बाजारात सुरु आहेत.
टाटा नेक्सॉन इव्ही मॅक्समध्ये नवं काय
टाटा नेक्सॉनमध्ये अनेक व्हेरिएंट आहेत आणि ते ग्राहकांच्या चांगल्या पसंतीला आले आहेत. नेक्सॉनची इलेक्ट्रिक कारही चांगली पसंतीला उतरले आहे. सध्या टाटा नेक्सॉन इव्ही सिंगल चार्जिंगवर 300 किमी अंतरापर्यंत जाते, आता नव्या इव्ही मॅक्समध्ये 400 किमीपर्यंत अंतर एकाच चार्जिंगमध्ये पार करणे शक्य होणार आहे. चारशे किमी अंतरात मुंबई कोल्हापुर, मुंबई औरंगाबाद हे अंतर एकाच चार्चिंजमध्ये पार करणे सहज शक्य होणार आहे. हे मॉडेल आणि त्याची किंमत 11 मेला जाहीर करण्यात येईल.
Stay charged to the MAX at all times. Prepare to be moved to the MAX with #NexonEVMAX.
Watch the LIVE launch on 11.05.2022 at 11:30 AM IST: https://t.co/Eq39F2v5HM#EvolveToElectric pic.twitter.com/se827RG9qV
— Tata Passenger Electric Mobility Limited (@Tatamotorsev) May 9, 2022
अधिक चांगली बॅटरी आणि इतर सुविधाही
सध्या नेक्सॉन इव्ही ही इलेक्ट्रिक कारमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. यापूर्वी 2020 साली टाटा नेक्सॉन इव्ही लाँच करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत त्या मॉडेलमध्ये थोडे बदल करुन, अधिक अपडेट्ससह टाटा नेक्सॉन इव्ही मॅक्स हे मॉडेल आता ग्राहकांसाठी येणार आहे. नव्या इंटिरियरसह, पॉवर अपडेट्ससह हे मॉडेल ग्राहकांपर्यंत येणार आहे. या कारची बॅटरीही आधीच्या कारपेक्षा जास्त चांगली असणार आहे.
लूक आणि फिचर्समध्येही बदल
टाटा नेक्सॉन इव्ही मॅक्स हे टाटा नेक्सॉन इव्हीचं टॉप मॉडेल असेल. याची बॅटरी 40kwh असेल, टाटा नेक्सॉन इव्हीत ही बॅटरी 30kwh एवढी होती. नव्या कारच्या लूकमध्येही बराच व्हरायटी मिळतील. यात स्पोर्ट्स मोड, पार्क मोड, क्रूझ मोड यासह अनेक खास फिचर्स दिले जाणार आहेत.
Gear up for electrifying drives. Prepare to be moved to the MAX with #NexonEVMax. Coming Soon #EvolveToElectric pic.twitter.com/LwEPI88oC1
— Tata Passenger Electric Mobility Limited (@Tatamotorsev) May 5, 2022