TATA Nexon अवघ्या 5 लाखात, ऑफर वाचून आजच गाडी घ्यायचं होईल मन
TATA Nexon Low Price: टाटा नेक्सन या गाडीची किंमत फेब्रुवारी महिन्यात 15 हजार रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे गाडी विकत घेण्याचा विचारात असलेल्यांचा खिशावर भार पडला आहे. मात्र हीच गाडी तुम्हाला पाच लाखात मिळत असेल तर...चला जाणून घ्या ऑफरबाबत
मुंबई: जानेवारी 2023 मध्ये टॉप कारच्या यादीत टाटा नेक्सन ही गाडी सुद्धा आहे. टॉप 10 यादीतील ही पाचवी गाडी आहे.एसयूव्ही सेगमेंटमधील या गाडीला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. जानेवारी 2023 या महिन्यात 16,357 युनिट्सची विक्री झाली आहे.यावरूनच या गाडीची लोकप्रियता अधोरेखित होते. टाटा नेक्सन सुरुवातीची किंमत 7.79 लाख (एक्स शोरुम) इतकी आहे. मात्र टॅक्स भरल्यानंतर या गाडीची ऑनरोड किंमत आणखी वाढते.नुकतीच कंपनीने गाडीची किंमत 15 हजार रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे हे बजेट अनेकांच्या आवाक्याबाहेर जातं.असं असताना सेकंड हँड नेक्सन गाडीचाही ग्राहकांमध्ये बोलबाला आहे. जर तुम्हाला टाटा नेक्सन ही गाडी कमी किंमतीत म्हणजेच 5 लाखात विकत घ्यायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कार्स 24 या वेबसाईटवर याबाबत काही पर्याय देण्यात आले आहेत. या गाडीची किंमत 5 लाखापासून सुरु होते. चला तर जाणून घेऊयात नेमकी ऑफर काय आहे.
वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या 2018 टाटा नेक्सन एक्सएम 1.2 मॅन्युअलसाठी 5.35 लाख रुपये मोजावे लागतील. ही गाडी विक्रीसाठी नोएडात उपलब्ध आहे. या गाडीचा क्रमांक UP-14 ने सुरु होतो. कार आतापर्यंत 74,292 किमी अंतर चालली आहे. ही एक पेट्रोल इंजिन कार असून गाडी फर्स्ट ओनरशिप आहे.
दुसऱ्या ऑफरमध्ये 2018 टाटा नेक्सन एक्सएमए 1.5 ऑटोमेटीक उपलब्ध आहे. या गाडीसाठी 5.35 लाखांची मागणी केली आहे. ही गाडीसुद्धा नोएडामध्ये उपलब्ध आहे. ही गाडी 94,046 किमी चालली आहे. या गाडीचा क्रमांक डीएल-8सी पासून सुरु होतो. पेट्रोल इंजिन असून कार फर्स्ट ओनरशिप आहे.
तिसऱ्या ऑफरमध्ये 2019 चं मॉडेल आहे. टाटा नेक्सन एक्सएम 1.2 मॅन्युअलसाठी 6.98 लाखांची मागणी करण्यात आली आहे. या गाडीचा क्रमांक एचआर-26 ने सुरु होतो. ही गाडीसुद्धा विक्रीसाठी नोएडात उपलब्ध आहे. ही गाडी 47,428 किमी चालली आहे. पेट्रोल इंजिन असून कार फर्स्ट ओनर आहे.
2021 टाटा नेक्सन एस्कई रेवोटोरक्यू मॅन्युअलसाठी तुम्हाला 8.21 लाख रुपये मोजावे लागतील. ही गाडीसुद्धा नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या गाडीचा क्रमांक डीएल-12 पासून सुरु होतो. ही गाडी फक्त 29,918 किमी चालली आहे. डीझेल इंजिन असून गाडी फर्स्ट ओनर आहे.
किंमत 15 हजाराने वाढली
टाटा मोटर्सने नेक्सन या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत पुन्हा एकदा वाढवली आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वर्जनचा समावेश आहे. कंपनीने गाडीची किंमत 15 हजार रुपयाने वाढवली आहे. कंपनीने या गाडीची किंमत चौथ्यांदा वाढवली आहे. यापूर्वी जानेवारी 2022, जुलै 2022 आणि नोव्हेंबर 2022 मध्ये गाडीची किंमत वाढवली होती.