Tata Nexon | आता नेक्सॉनच्या डार्क एडिशनने ग्राहकांना केले घायाळ! कशी असेल नवीन कार
Tata Nexon | तुम्ही जर नेक्सॉन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमची योजना काही दिवसांसाठी लांबवा. कारण नेक्सॉनची एकदम जबरदस्त डार्क एडिशन लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या नवीन लूकची बाजारात चर्चा सुरु आहे. या व्हेरिएंटची माहिती कंपनीला लपविता आली नाही.
नवी दिल्ली | 21 February 2024 : टाटा नेक्सॉन सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. टाटा मोटर्सने बाजार इनकॅश करण्यासाठी अजून कंबर कसली आहे. बेस्ट सेलिंग SUV नेक्सॉनची डार्क एडिशन लाँच करण्याची तयारी कंपनीनेक केली आहे. कंपनीने यापूर्वी झालेल्या भारत मोबिलिटी एक्सपो 2024 मध्ये ही कार सादर केली होती. पण ही कार बाजारात दाखल होण्यापूर्वीच तिच्या डार्क एडिशन व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे.
डार्क एडिशनचे 14 व्हेरिएंट येणार
डार्क एडिशन क्रिएटिव्ह ट्रिममध्ये एकूण 14 व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात येणार आहे. यामध्ये 8 पेट्रोल आणि 6 डिझेल व्हेरिएंटचा समावेश आहे. हे एडिशन स्मार्ट आणि प्योर ट्रिममध्ये उपलब्ध नसेल. तर या नवीन डार्क एडिशनविषयी जाणून घेऊयात.
नेक्सॉन डार्क एडिशनचे एक्सटिरिअर आणि इंटिरिअर
नेक्सॉनच्या डार्क एडिशनमध्ये ऑल ब्लॅक थीम असेल. या कारच्या बाहेरील भागाचा विचार करता ती चमकदार एटलस ब्लॅक शेडमध्ये असेल. याशिवाय, गन मेटल ग्रेमध्ये खास 5-स्पोक एलॉय व्हील आणि समान ग्रे शेडमध्ये रुफ रेल्स पण असेल. नवीन दमदार कारमध्ये फ्रंट फेडर आणि रिअर टेलगेट दोघांमध्ये डार्क एडिशन बेज देण्यात आला आहे. या कारच्या कॅबिनमध्ये ब्लॅक रुफ लायनर, एक ब्लॅक डॅशबोर्ड, ब्लॅक डोअर पॅनल आणि एक ब्लॅक स्टिअरिंग व्हिल असेल. यामध्ये व्हाईट वा रेड हाईलाईटचा स्पोर्ट टच बघायला मिळेल. यामध्ये वेलकम आणि गुडबाय असा LED लाईट बार आणि स्टँडर्ड नेक्सन ईव्हीसह इतर अनेक फीचर्सची रेलचेल असेल.
नेक्सन डार्क एडिशन पॉवरट्रेन, ट्रान्समिशन
नेक्सन डार्क एडिशनमध्ये सध्याच्या मॉडेलमधील इंजिन असेल. यामध्ये एक 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. ते 113bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करेल. तर दुसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन असेल. ते 113bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करेल. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल AMT गियरबॉक्स आणि 7-स्पीड DCT युनिटचा पर्याय असेल.
महाग असेल एडिशन
नेक्सॉनवर टाटाने मोठी सूट जाहीर केली आहे. एमजी कोमेटची किंमत कमी झाल्यावर बाजारात, इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. पण नेक्सॉनची डार्क एडिशन बाजारातील स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 30,000 रुपयांनी महाग असेल. सध्या नेक्सॉनची सुरुवातीची, एक्स-शोरुम किंमत 8.15 लाख रुपये आहे. तर नेक्सॉनचे iCNG मॉडेल लवकरच बाजारात येईल.