Tata Punch, Nexon, Harrier, Safari Kaziranga एडिशनमध्ये मिळणार 5 खास फीचर्स
टाटा मोटर्सने (Tata Motors) या आठवड्याच्या सुरुवातीला, आयपीएल 2022 (IPL 2022) साठी नवीन टाटा पंच (Tata Punch) काझीरंगा एडिशन (Kaziranga Edition) कार सादर केली आहे. टाटा समूह आता इंडियन प्रीमियर लीग 2022 आणि 2023 च्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक आहे.
मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) या आठवड्याच्या सुरुवातीला, आयपीएल 2022 (IPL 2022) साठी नवीन टाटा पंच (Tata Punch) काझीरंगा एडिशन (Kaziranga Edition) कार सादर केली आहे. टाटा समूह आता इंडियन प्रीमियर लीग 2022 आणि 2023 च्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक आहे. यामुळे, कंपनीने पंच काझीरंगा एडिशन कार सादर केली आहे, या कारचा आयपीएल 2022 स्पर्धेदरम्यान, लिलाव केला जाईल. या लिलावातून मिळणारा पैसा आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या (Kaziranga National Park) संरक्षणासाठी खर्च केला जाणार आहे. कंपनीने काझीरंगा एडिशन – नेक्सॉन, हॅरियर, सफारी, पंच नाऊ साठी एक नवीन टीझर जारी केला आहे. हा टीझर सूचित करतो की नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीसाठी अशा आणखी काझीरंगा एडीशन्सचे नियोजन केले जात आहे.
या प्रत्येक SUV चे हेडलॅम्प समोरच्या रस्त्यावर गेंड्याची प्रतिमा प्रतिबिंबित करतात. सध्या आसामच्या जंगलात 3,000 गेंडे आहेत, त्यापैकी 2,000 एकट्या काझीरंगा येथे आढळतात. हे एक शिंग असलेले गेंडे आहेत आणि त्यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. या विशेष टाटा काझीरंगाच्या एडिशन्सचा लिलाव हे संरक्षण सुरू ठेवण्यासाठी कामी येईल.
Kaziranga एडिशनमध्ये मिळणार 5 खास फीचर्स
- टाटा ने आत्तापर्यंत पाच खास फीचर्स सादर केले आहेत, जे या आगामी SUV कार्समध्ये मिळतील. टाटाची Nexon SUV कार ही सर्वाधिक विकली जाणारी कार आहे, ज्यामध्ये वेंटीलेटेड सीट्स आणि ड्युअल टोन एडिशन मिळेल.
- इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्पेशल एडिशन SUV रीअर व्ह्यू मिरर किंवा IRVM सह येते, जे ऑटो डिमिंग फेसिलिटीसह येते. हे फीचर Nexon Kanjiranga Edition मध्ये उपलब्ध असेल. या फीचरच्या मदतीने रोड व्हिजनमध्ये मदत होईल.
- टाटा सफारी कांझीरंगा एडिशनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधाही उपलब्ध असेल. पण हे फीचर्स थ्री-रो वाल्या 7-सीटर एसयूव्ही कारमध्ये उपलब्ध असेल.
- यात व्हॉईस असिस्टंटचे फीचर्सही मिळतील. तसेच 7 इंचांची टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल.
- पाचवे फीचर म्हणजे एअर प्युरिफायर, जे कारमधील हवा स्वच्छ करण्यास मदत करेल.
Nexon च्या काझीरंगा एडिशनमध्ये काय असेल खास?
रायनो मोटिफ फ्रंट फेंडर, रियर विंडस्क्रीन, ग्लोव्हबॉक्सवर दिसू शकतो आणि काझीरंगा हा शब्द स्कफ प्लेट्सवर लिहिलेला आहे. काझीरंगा एडिशन टाटाच्या स्पेशल एडिशनच्या लांबलचक यादीचा किंवा सफारी डार्क, गोल्ड आणि अॅडव्हेंचर पर्सोना एडीशन्ससह व्हिज्युअल अपडेटेड व्हेरियंटचा भाग आहे. Nexon, Nexon EV आणि Altroz या गाड्यांनाही गेल्या वर्षी डार्क एडिशन ट्रीटमेंट मिळाली होती, तर Harrier ला ती काही महिन्यांपूर्वी मिळाली होती.
इंटीरियरमध्ये दोन-टोन ब्लॅक आणि ब्रॉन्झ थीम आणि अॅडजस्टेबल हेडरेस्ट, अॅपल कारप्लेसह फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, रेग्युलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, माउंटेड कंट्रोल्ससह स्टीयरिंग व्हील, दिशानिर्देशांसह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट/स्टॉपसारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.
परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल न करता, टाटा नेक्सॉन काझीरंगा एडिशन 1.2 लीटर तीन-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर फोर-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे सुसज्ज असेल. जे अनुक्रमे 120 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क आणि 110 PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट. स्पेशल एडिशनमध्ये सिक्स-स्पीड मॅन्युअल आणि सिक्स-स्पीड एएमटी असे दोन्ही पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
आता इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरी रिसायकल होणार, Ford आणि Volvo ने सुरु केली स्टार्टअप कंपनी
BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?