मुंबई : टाटा मोटर्स 4 ऑक्टोबर 2021 रोजी देशातील लोकप्रिय पंच मायक्रो एसयूव्ही अधिकृतपणे लॉन्च करण्याच्या तयारीत आहे आणि कार निर्माता कंपनी त्याच दिवसापासून या एसयूव्हीसाठी प्री-बुकिंग घेणं सुरू करेल. भारतीय कार उत्पादक कंपनीने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे कारच्या लाँचिंग आणि बुकिंग्सबाबतची पुष्टी केली आहे. (Tata Punch pre-booking will start from October 4, many great features will be available in car)
दरम्यान, मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमधील टाटा मोटर्सचे निवडक डीलर्स आधीच आगामी मिनी एसयूव्हीसाठी 5,000 ते 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह प्री-बुकिंग स्वीकारत आहेत. बुकिंग रद्द केल्यास हे पैसे परत मिळतील. कार निर्मात्या कंपनीने आपल्या सोशल मीडिया चॅनल्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात म्हटले आहे की, पंचचे दरवाजे 90 अंशांच्या कोनात उघडतील. या सुविधेमुळे लोकांना वाहनातून आत किंवा बाहेर जाणे सोपे होईल.
नवीन टाटा पंच ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) वर बनवलेली पहिली SUV असेल आणि भारतातील Nexon subcompact SUV च्या खाली असेल. पंचमध्ये कंपनीच्या इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजचा वापर करण्यात आला आहे. ही कार आक्रमक स्टायलिंग लूकसह येते. टाटा मोटर्सने आधीच निळ्या आणि ड्युअल-टोन रंगाचे पर्याय जाहीर केले आहेत आणि सिंगल टोन रंगांसह आणखी दोन-टोन पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. “सणासुदीच्या काळात ही कार नॅशनल लाँचिंगसाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पोर्टिंग डायनॅमिक्ससह टफ यूटिलिटीचं मिश्रण या कारमध्ये पाहायला मिळेल.
टाटा मोटर्सने पुष्टी केली आहे की, पंच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या अपोझिट जॅक-अप हॅचबॅकपेक्षा अधिक श्रेष्ठ असेल आणि या एसयूव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स असतील. कंपनीने सूचित केले आहे की, या कारमध्ये काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील जसे की, ट्रॅक्शन मोड (सँड, रॉक, मड), हिल डिसेंट कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट, तसेच एसयूव्ही क्रेडेन्शियलसारखे काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील. ही कार पुढच्या बाजूला 185 मिमीच्या हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि 16 इंच अलॉय व्हीलसह येईल.
टाटाच्या सिग्नेचर स्प्लिट लायटिंग डिझाइनसह या कारचा फ्रंट एंड आक्रमक आहे. टाटा लोगोमधील काळ्या पॅनेलमध्ये ट्राय-अॅरो पॅटर्न देखील आहे, ज्याभोवती एलईडी डे-टाइम रनिंग लँप आहे. तर मुख्य हेडलॅम्प युनिट्स खाली स्थित आहेत, जे प्रोजेक्टर लाइटसह येतील. समोरचा बहुतेक भाग जड कव्हरने झाकलेला आहे आणि त्याला एक मोठा ट्राय-अॅरो डिझाईन ग्रिल आणि मोठे गोल फॉग लॅम्प मिळतात.
कंपनीने पंचचे स्पेसिफिकेशन्स उघड केले नाहीत, तथापि, काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे की, नवीन पंच 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिनसह येईल, जे Altroz प्रीमियम हॅचबॅकला पॉवर देतं. पेट्रोल मिल 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आणि पर्यायी AMT युनिटसह येण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यावर, नवीन टाटा पंच मारुती सुझुकी एस-प्रेसो आणि रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करेल. गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो दरम्यान टाटा मोटर्सने पंचला HBX कॉन्सेप्ट मायक्रो-एसयूव्ही म्हणून पहिल्यांदा प्रदर्शित केली. पंच एसयूव्ही मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी ह्युंडई मायक्रो-एसयूव्हीला टक्कर देईल, या कारला कॅस्पर म्हटले जाण्याची शक्यता आहे.
तथापि, कंपनीने येथे वाहनाबद्दल फारशी माहिती सादर केलेली नाही. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, “टाटा पंच, हे नावाप्रमाणेच, एक एनरजेटिक व्हीकल आहे ज्यामध्ये कुठेही जाण्याची क्षमता आहे. ते पुढे म्हणाले की, ही कार ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल. कॉम्पॅक्ट सिटी कारमध्ये एसयूव्ही फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार बनवण्यात आली आहे. पंच आमच्या एसयूव्ही फॅमिलीमधील चौथे वाहन आहे. अशा परिस्थितीत, आता आम्ही रेंज ऑप्शन वाढवण्याचा विचार करीत आहोत.
इतर बातम्या
Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?
महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात
(Tata Punch pre-booking will start from October 4, many great features will be available in car)