टाटाच्या ‘या’ कारची MG Hector आणि Hector Plus वर मात, SUV चा भारतीय बाजारात धुमाकूळ

टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी त्यांची नवीन टाटा सफारी (Tata Safari 2021) 7 सीटर कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केली आहे.

टाटाच्या 'या' कारची MG Hector आणि Hector Plus वर मात, SUV चा भारतीय बाजारात धुमाकूळ
Tata Safari
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 7:16 AM

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी त्यांची नवीन टाटा सफारी (Tata Safari 2021) 7 सीटर कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केली आहे. Tata Safari 2021 SUV ची सुरुवातीची किंमत 14.69 लाख रुपये (एक्स शो-रूम) इतकी ठेवण्यात आली आहे. या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 21.25 लाख रुपये इतकी आहे. टाटा मोटर्स कंपनीने काही आठवड्यांपूर्वी ही कार सादर केली होती. तसेच या कारचं बुकिंगदेखील सुरु करण्यात आलं आहे. कंपनीने नवीन टाटा सफारी 6 सीटर आणि 7 सीटर अशा दोन पर्यायांसह लाँच केली आहे. दरम्यान, ही कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. (Tata Safari and Harrier beat MG Hector and Hector Plus in Indian Market)

वाहन तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टाटाने डीलर्सकडे सफारीच्या 1707 युनिट्सचं शिपिंग केलं आहे. दरम्यान, सफारी आणि हॅरियरच्या सेलचा एकत्रित विचार केला तर टाटाने एमजी हेक्टर (MG Hector) आणि हेक्टर प्लसपेक्षा (MG Hector Plus) अधिक वाहनांची विक्री केली आहे. मार्केटमध्ये विक्रीच्या बाबतीत हॅरियर-सफारी जोडीने हेक्टर-हेक्टर प्लस जोडीवर मात केली आहे. हॅरियरच्या फेब्रुवारीमधील विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास टाटाने या महिन्यात हॅरियरच्या 2030 युनिट्सची विक्री केली आहे. तर सफारीच्या 1707 युनिट्सची विक्री केली आहे. दोन्ही मिळून टाटाने एकूण 3737 वाहनांची विक्री केली आहे. एमजी हेक्टर मात्र याबाबतीत हॅरियर-सफारीच्या मागे राहिली आहे.

2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.

अशी आहे All New Tata Safari 2021

नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते. दरम्यान कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वात बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

कशी आहे Mg Hector?

एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने गेल्या महिन्यात भारतात MG हेक्टरची नवी गाडी लाँच केली आहे. एमजी या कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 2019 ला दमदार इंट्री केली होती. त्यानंतर अनेक एकापेक्षा एक चांगल्या गाड्या कंपनीने मार्केटमध्ये लाँच केल्या होत्या. या गाडीची किंमत 12.89 लाखापासून सुरु होत आहे. या विविध फिचर्स असल्याने सध्या या गाडीची मार्केटमध्ये चांगलीच चर्चा आहे. मिड साइज एसयूव्ही एमजी हेक्टरला सध्या भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. MG Motor India ही प्रसिद्ध कार 7 सीटर व्हेरियंटसह (MG Hector Plus 7 Seater) जानेवारी 2021 मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात MG च्या MG Hector, MG ZS EV, MG Hector Plus 6 Seater आणि MG Gloster या कार उपलब्ध आहेत.

कंपनीने नवीन CVT गियरबॉक्स सध्याच्या पेट्रोल इंजिनसोबत जोडलं आहे. यापूर्वी एमजी हेक्टर पेट्रोल वेरियंट डुअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) सादर करण्यात आलं होतं. नवीन CVT युनिट 2021 एमजी हेक्टरमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत जोडलं जाईल. हे इंजिन 141 बीएचपी आणि 250 एनएम टार्क जनरेट करतं. सध्या हे 6-स्पीड मॅनुअल आणि डीसीटी गियरबॉक्ससह दिलं जातं. नव्या ट्रान्समिशन अपडेटसह एमजी इंडिया हेक्टरची किंमत जवळपास 50,000-60,000 रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर बातम्या

9 मार्चला नव्हे ‘या’ दिवशी लाँच होणार बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace, बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी

सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर

Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी

(Tata Safari and Harrier beat MG Hector and Hector Plus in Indian Market)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.