Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tesla विरोधात चीन आक्रमक, आधी लष्कराकडून बंदी, आता सरकारी कार्यालयांमध्ये नो एंट्री

भारतीयांना टेस्लाच्या कार्सची प्रतीक्षा आहे, असे असतानाच भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये टेस्लाबाबत वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Tesla विरोधात चीन आक्रमक, आधी लष्कराकडून बंदी, आता सरकारी कार्यालयांमध्ये नो एंट्री
Tesla Model 3
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 12:03 AM

बीजिंग : जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची (Tesla) नुकतीच भारतात एन्ट्री झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. त्यामुळे अनेक भारतीयांना टेस्लाच्या कार्सची प्रतीक्षा आहे. असे असतानाच भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये टेस्लाबाबत वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी तिथल्या लष्कराने टेस्लाच्या गाड्यांवर बंदी घातली आहे. टेस्लाच्या गाड्यांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका असल्याचे तिथल्या लष्कराने नमूद केलं आहे. दरम्यान, आता अशी माहिती मिळाली आहे, की चिनी सरकार टेस्लाच्या गाड्यांबाबतचा आपला निर्णय बदलण्यास तयार नाही, त्यामुळे चीनमध्ये Tesla च्या अडचणी वाढल्या आहेत. (Tesla electric cars get banned from entering Chinese Government offices)

चीनमध्ये टेस्लाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यापूर्वी टेस्ला कारवर हेरगिरीचा आरोप करण्यात आला होता, ज्या संदर्भात टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी यापूर्वी त्यांच्या वाहनांमध्ये अशी कोणतीही उपकरणे बसविलेली नाहीत, हेरगिरी करण्यासाठी त्यामध्ये कोणतेही कॅमेरे, रेकॉर्डर तथा तत्सम उपकरणे बसवण्यात आलेली नाहीत, याची माहिती मस्क यांनी चिनी अधिकाऱ्यांना दिली आहे. परंतु असे करूनही चीन सरकार टेस्लाला सूट देण्याच्या मूडमध्ये नाही, असे चित्र दिसत आहे. आता टेस्लावर चिनी सरकारने मोठी कारवाई केली असून कंपनीच्या वाहनांना शासकीय कार्यालयात प्रवेश देण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता कोणताही टेस्ला वाहनधारक त्याची कार घेऊन चीनमधील कोणत्याही सरकारी कार्यालयांच्या आवारात प्रवेश करु शकत नाही.

बीजिंग आणि शांघायमध्ये टेस्लाला विरोध

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजिंग आणि शांघायमधील दोन सरकारी एजन्सींनी त्यांच्या कार्यालयाजवळ टेस्लाची वाहने पार्क करण्यास मनाई केली आहे. हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले आहे. या सरकारी एजन्सींचं म्हणणं आहे की, टेस्लाच्या गाड्यांमध्ये कॅमेरे असतात. यापूर्वीदेखील टेस्लाच्या वाहनांबद्दल असे म्हटले जात होते.

टेस्ला वाहनांच्या गोपनीयतेबाबत चिनी सैन्याचे प्रश्न

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चीन जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. टेस्लाचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. परंतु टेस्लाच्या वाहनांविषयी चिनी सैन्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चिनी सैन्याने आपल्या कंपाऊंड व कॉम्प्लेक्समध्ये टेस्ला वाहनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेल्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार असे सांगितले जात आहे की, टेस्ला वाहनांच्या गोपनीयतेबाबत चिनी सैन्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

…म्हणूनच टेस्लामध्ये कॅमेरे असतात.

टेस्लाच्या गाड्यांमध्ये पार्क असिस्ट, ऑटोपायलट आणि सेल्फ ड्रायव्हिंग यांसारखी प्रगत ड्राईव्ह वैशिष्ट्ये दिली जातात. या फीचर्सना मदत करण्यासाठी टेस्ला कार कॅमेर्‍याने सुसज्ज आहेत. काही टेस्ला कारमध्ये केबिनमध्येदेखील एक कॅमेरा असतो जो ड्रायव्हरवर लक्ष ठेवतो.

यापूर्वी, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी आपली ईव्ही उत्पादन करणारी कंपनी चीनसाठी धोकादायक नसल्याचे सांगितले होते. मार्च महिन्यात चीनी सैन्याने लष्करी कॅम्पसमध्ये टेस्ला कारवर बंदी घातल्यानंतर काही दिवसांनी मस्क यांनी चीनला सांगितले की, जर त्यांची कंपनी चीनमध्ये किंवा कोठेही हेरगिरी करत असेल किंवा त्यांच्या कारचा अशा कामासाठी वापर केला जात असेल, तर ती कंपनी बंद केली जाईल.

चीनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

या अहवालात असे सांगितले गेले आहे की टेस्ला कंपनी कारमधील कॅमेऱ्याद्वारे डेटा गोळा करीत असल्याचा चीनी लष्कराला संशय आहे. हा डेटा चीनी सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. अशा परिस्थितीत हे प्रकरण लष्करासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. आता मिलिट्री हाऊसिंग कॉम्प्लेक्सला सांगितले आहे की प्रत्येकजण (ज्यांच्याकडे टेस्ला ईव्ही आहे असे सर्वजण) त्यांच्या टेस्ला ईव्हीला सैन्यापासून दूर ठेवतील, कारण लष्करासंबंधीची माहिती लीक झाल्यास, त्याने देशाला खूप मोठा धोका पत्करावा लागू शकतो.

टेस्लाचा कॅमेरा गोपनीय माहिती मिळवू शकतो?

टेस्ला वाहने बऱ्याच कॅमेर्‍यांनी सज्ज आहेत, जी कार मालकास मार्गदर्शक पार्किंग, ऑटोपायलट आणि सेल्फ-ड्रायव्हिंग फंक्शनिंगमध्ये मदत करतात. टेस्लाच्या बर्‍याच वाहनांमध्ये सेंट्री मोड देखील आहे. तथापि, मॉडेल 3 टेस्लाची सर्वात प्रसिद्ध आवृत्ती मानली जाते. कंपनीकडून हे सर्वात किफायतशीर वाहन मानले जाते. शांघायमध्ये या वाहनाचे स्थानिक उत्पादन सुरू झाल्यापासून त्याची विक्री अधिक वाढली आहे. पण आता चिनी लष्कराने निर्माण केलेल्या प्रश्नांनंतर असं म्हटलं जातंय की, टेस्लाचा जो इंटर्नला कॅमेरा आहे, तो गोपनीय माहिती मिळवू (अॅक्सेस करु शकतो) शकतो. अशा परिस्थितीत कंपनीने म्हटलं आहे की, इन कार कॅम्स टेस्लाच्या गाड्यांमध्ये काम करत नाहीत.

संबंधित बातम्या

‘ही’ असेल Tesla ची भारतातील पहिली कार, कंपनी गुजरातमध्ये कामकाज सुरु करणार?

Cryptocurrency बाबतच्या एक ट्विटमुळे हिरो बनला झिरो, Elon Musk वर जगभरातून टीकेची झोड

(Tesla electric cars get banned from entering Chinese Government offices)

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.