महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर Tesla Model 3 चं टेस्टिंग, भारतात लाँचिंग कधी?

| Updated on: Aug 20, 2021 | 3:55 PM

भारतातील रस्त्यांवर टेस्ला मॉडेल 3 (Tesla Model 3) ही इलेक्ट्रिक कार पाहणे चमत्कारापेक्षा कमी नाही. ग्राहक या वाहनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर Tesla Model 3 चं टेस्टिंग, भारतात लाँचिंग कधी?
Tesla Model 3
Follow us on

मुंबई : भारतातील रस्त्यांवर टेस्ला मॉडेल 3 ही इलेक्ट्रिक कार पाहणे चमत्कारापेक्षा कमी नाही. ग्राहक या वाहनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय रस्त्यांवर आतापर्यंत या वाहनाची अनेक वेळा चाचणी करताना दिसून आले आहे. पण अलीकडच्या काही लीक झालेल्या फोटोंमध्ये ही कार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिसली आहे. वाहनाची रजिस्ट्रेशन प्लेट महाराष्ट्राची होती. (Tesla Model 3 spied testing again ahead of possible India launch, EV Seen in Maharashtra)

टेस्लाने अद्याप भारतातील इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात औपचारिकपणे प्रवेश केला नाही, मात्र कंपनीने कर्नाटकमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स म्हणून कंपनीची नोंदणी केली आहे. बंगळुरूमध्ये संशोधन आणि विकास केंद्र (आर अँड डी सेंटर) स्थापन करण्यासाठी कंपनीची चर्चा सुरू आहे. अहवालानुसार, टेस्ला भारतातील पहिली फॅसिलिटी केरळ किंवा महाराष्ट्रात उभारू शकते.

अलिकडच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, टेस्ला मॉडेल 3 इलेक्ट्रिक कार लाँच करेल, जी या वर्षाच्या अखेरीस कंपनीची भारतातील सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कार आहे. काही अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, टेस्ला लवकरच भारतात या कारचे बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात करेल.

भारत सरकार आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्यात आयात शुल्काबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही, ज्यामुळे कारचे भारतातील लाँचिंग विलंबाने होऊ शकते. पण आता असे दिसतेय की, लवकरच टेस्ला त्यांच्या भारतीय चाहत्यांना चांगली बातमी देऊ शकते. खरं तर, अलीकडेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन टेस्ला मॉडेल 3 कार पाहायला मिळाल्या आहेत, ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, ही कार लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते.

खरं तर, टेस्ला क्लब इंडिया (Tesla Club India) नावाच्या अनधिकृत हँडलने दोन कॅमोफ्लॉज्ड मॉडेल 3 टेस्ट व्हीकल्सचे फोटो ट्विट केले आहेत. एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दोन गोपनीय मॉडेल 3 टेस्ट यूनिट्स. पूर्वी पाहिल्याप्रमाणे टेस्टिंग उपकरणासह. 337 नवीन दिसते. ग्राउंड क्लिअरन्स वाढवला गेला आहे की फक्त प्रतिमेचा प्रश्न आहे?”

यासह, पुढील ट्वीटमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, “हे स्थान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील स्टारबक्सजवळ सुपरचार्जर पार्किंगचे संभाव्य ठिकाण आहे.”

भारतातील लाँचिंगसाठी कंपनीचं प्लॅनिंग

यापूर्वी ब्लू टेस्ला मॉडेल 3 पुण्याच्या रस्त्यावर पाहायला मिळाली होती, जी चीनच्या शांघायमधील त्याच्या गीगा फॅक्टरीमधून आणली होती. टेस्ला या वर्षी भारतात आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना आखत असल्याने, एलन मस्क संचालित कंपनीने देशात वरिष्ठ कार्यकारी अधिकारी नियुक्त केले आहेत, ज्यांनी देशातील काही कारभार आपल्या हाती घेतला आहे. तथापि, आयात शुल्कावरून सुरू असलेल्या वादामुळे टेस्ला मॉडेल 3 लाँच होण्यास विलंब होऊ शकतो.

$ 39,990 (अंदाजे 30 लाख रुपये) इतक्या किंमतीसह, टेस्ला मॉडेल 3 अमेरिकेत परवडणारे मॉडेल म्हणून उपस्थित आहे, परंतु कोणतेही आयात शुल्क न घेता, भारतात अंदाजे 60 लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असेल. ही किंमत भारतीय बाजारात परवडण्यायोग्य नाही.

इतर बातम्या

शानदार फीचर्ससह टाटा मोटर्सची सर्वात छोटी SUV लाँचिंगसाठी सज्ज, Creta, Seltos ला टक्कर

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरात परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

(Tesla Model 3 spied testing again ahead of possible India launch, EV Seen in Maharashtra)