टेस्ला मॉडेल Y मुळे मालकाची फजिती, हायवेवर ड्रायव्हिंगवेळी नको ते झालं आणि…
टेस्ला कारबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. पण गेल्या काही दिवसात घटना पाहून चिंता वाढली. अशी एक घटना टेस्ला मॉडेल Y बाबत समोर आली आहे. गाडीच्या मालकाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई- टेस्लाच्या एकापेक्षा एक सरस आशा गाड्या जागतिक बाजारपेठेत आहेत. टेस्ला ही कंपनी इलेक्ट्रिक कार कंपन्याच्या यादीत आघाडीवर आहे. टेस्लाच्या गाड्यांना नव्या तंत्रज्ञानामुळे मोठी मागणी आहे. पण गेल्या काही दिवसात काही घटना समोर आल्याने गाडयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. खासकरुन टेस्ला मॉडेल Y या इलेक्ट्रिक कारच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मॉडेल Y च्या मालकाने हायवेवर गाडी चालवत असताना गाडीचं स्टीयरिंग हातात आल्याचं दाखवून दिलं. याबाबतची तक्रार मालकाने टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना केली आहे. कार मालकाने हातात स्टीयरिंग व्हीलचे छायाचित्र घेऊन ट्विटरवर याबद्दल तक्रार केली आहे. तक्रारीनंतर मालकाने कार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रेरक पटेलने टेस्ला मॉडेल Y विकत घेतल्यापासून तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. कार घेतल्याच्या एका आठवड्यानंतर आपल्या कुटुंबाला ड्राईव्हसाठी नेण्याचा निर्णय घेतला. हायवेवरून आपल्या कुटुंबाला घेऊन जात असताना इलेक्ट्रिक वाहनाचे स्टीयरिंग तुटून हातात आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि गाडी पार्किंग केली. यामुळे त्याचा आणि कुटुंबियांचा जीव थोडक्यात वाचला असंच म्हणावं लागेल. प्रेरक पटेलनं ट्वीट करत लिहिलं आहे की, “एलोन मस्क, टेस्ला Y मॉडेल 24 जानेवारी 2023 रोजी आमच्या कुटुंबात आली. हायवेवर ड्रायव्हिंग करत असताना स्टीयरिंग तुटून हातात आलं. सुदैवाने मागे कोणतीही गाडी नव्हती. नाहीतर मोठा अपघात झाला आहे. कशीबशी डिव्हाडरजवळ आणण्यात यश आलं. ”
@elonmusk @TeslaOwnersWW @BLKMDL3 Family was excited to receive Tesla Y delivery on 1/24/2023. Was driving on highway and all the sudden steering wheel fall off, was lucky enough there was no car behind and I was able to pull on devider #SafetyFirst #Fixit #TeslaModelY #help pic.twitter.com/4UMokFA2cv
— Tesla, Y did the steering wheel fall off? Prerak (@preneh24) January 30, 2023
दुसरीकडे, प्रेरक पटेल यांनी, या समस्येला जबाबदार कोण आणि ती चालवायची कशी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोब पटेल यांनी अन्य कार मालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला.यासोबतच पटेल यांनी ट्विटर युजर्संना स्टीयरिंग रिपेअर करून मॉडेल Y परत स्वीकारावे की टेस्लाकडून नवीन वाहन घ्यावे याबाबत आपलं मत नोंदवण्यास सांगितलं आहे.
@elonmusk Response from Tesla Service Ctr pic.twitter.com/Jv5MTAravE
— Tesla, Y did the steering wheel fall off? Prerak (@preneh24) January 30, 2023
टेस्लानं गाड्यांच्या किमतीत केली घट
दुसरीकडे, गेल्या काही महिन्यात टेस्लाच्या मागणीत झालेली मोठी घट पाहता कंपनीने पुन्हा कारच्या किमतीत कपात केली आहे. यापूर्वी चीनमध्ये टेस्ला कारवर मोठी सूट दिली आहे. आता अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेसाठी टेस्ला कारच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. मॉडेल 3, मॉडेल X आणि मॉडेल Y सारख्या लक्झरी इलेक्ट्रिक कारच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, यूएस मार्केटमध्ये मॉडेल 3 सेडान आणि मॉडेल वाई क्रॉसओव्हर एसयूव्हीच्या किंमती 6 ते 20 पर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.