Royal Enfield : दमदार रपेट! तेही बुलेट खरेदी न करता

Royal Enfield : आता दमदार बुलेटवर रपेट मारण्यासाठी ती खरेदीच करावी असे बंधन नाही. तुम्ही या जानदार बाईकवर दिवसभर रपेट मारु शकता. रॉयल एनफिल्ड कंपनीने देशातील काही मोजक्याच शहरातील बुलेट प्रेमींसाठी खास ऑफर सुरु केली आहे. इथं मिळवा अधिक माहिती...

Royal Enfield : दमदार रपेट! तेही बुलेट खरेदी न करता
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 3:03 PM

नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : Royal Enfield प्रेमींसाठी एक आनंदवार्ता आहे. अनेकांना इच्छा असूनही ही बाईक काही खरेदी करता येत नाही. तर काहींना खरेदी करता येते, पण या शौकसाठी अधिकचा पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी नसते. नेमकी हीच अडचण ओळखून रॉयल एनफिल्ड कंपनीने एक खास योजना समोर आणली आहे. यामुळे बुलेट प्रेमींची (Bullet Lovers) नाराजी आता दूर होणार आहे. त्यांना पण शहराच्या आसपास दिवसभर मनसोक्त भटकता येणार आहे. ते पण बुलेट खरेदी न करता. सध्या ही योजना देशातील काही मोजक्याच शहरात सुरु करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास कदाचित कंपनी ही योजना अनेक शहरात लाँच करु शकते. कंपनीचा प्लॅन तरी काय?

योजना अशी जोरदार

तर कंपनीने बुलेट प्रेमींसाठी खास योजना आणली आहे. कंपनीचे त्या शहरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही मॉडेलवर तुम्हाला रपेट मारता येईल. त्यासाठी काही भाडे भरावे लागेल. रॉयल एनफिल्डने त्यासाठी खास रेंटल योजना (Royal Enfield Rental Program) सुरु केली आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. देशातील 25 शहरात ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामधेय दिल्ली, जयपूर, हरिद्वार, चेन्नई, देहरादून आणि इतर शहरांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

300 बुलेट उपलब्ध

बुलेटला अजून लोकप्रियता मिळवून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. सध्या देशातील 25 शहरात योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 300 बुलेट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तुमचे बुलेट चालविण्याचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. दिवसभरासाठी एका निश्चित किरायावर बुलेटवर रपेट मारता येईल.

किती आहे भाडे

royalenfield कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, उपलब्ध शहरात बुलेटच्या मॉडेलनुसार तुम्हाला भाडे अदा करावे लागेल. दिल्ली शहरात रॉयल एनफिल्ड बुलेट एका दिवसाच्या भाड्यावर घेतल्यास 1200 रुपये मोजावे लागतील. तर रॉयल एनफिल्ड हिमालयन बाईकसाठी 1533 रुपये भाडे मोजावे लागेल.

काय आहे प्रक्रिया

  • कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • रेंटल हा पर्याय निवडून शहर, पिक-अप तारीख नोंद करावी लागेल.
  • त्यानंतर ही बाईक एक दिवसासाठी की दोन दिवसांसाठी घ्यायची ते नमूद करावे लागेल.
  • ड्रॉफ-ऑफ-तारीख टाकल्यानंतर उपलब्ध मॉडल आणि किरायाची माहिती देईल.
  • काही आगाऊ रक्कम भरावी लागेल. एक अर्ज भरावा लागेल. आगाऊ रक्कम रिफंडेबल असेल.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.