Maruti, Tata आणि Mahindra साठी मोजा जादा पैसा, जाणून घ्या किती वाढतील किंमती

Car Price | पुढील वर्षात चारचाकीचे स्वप्न महागणार आहे. कारच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. मारुती, महिंद्रा आणि ऑडी या कंपन्यांनी 1 जानेवारीपासून कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स आणि मर्सिडीज बेंझ या कंपन्या पण किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.

Maruti, Tata आणि Mahindra साठी मोजा जादा पैसा, जाणून घ्या किती वाढतील किंमती
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 10:18 AM

नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2023 : जर तुम्ही चारचाकी घेण्याचे स्वप्न पाहात असाल तर जादा खर्चासाठी तयार राहा. कारण पुढील वर्षात काही कंपन्यांनी कारच्या किंमतीत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. तर काही कंपन्या त्याचा विचार करत आहेत. मारुती सुझूकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ऑडी इंडिया आणि मर्सिडीज बेंझ इंडिया या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. महागाईचा फटका आणि कच्चा मालाचे भाव वाढल्याने कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने बजेट कार ऑल्टोपासून ते मल्टी युटिलिटी कारपर्यंत सर्वांच्या किंमतीत वाढ केली आहे. या कारची किंमत 3.54 लाख रुपये ते 28.42 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) यादरम्यान आहे. प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

दरवाढीशिवाय पर्याय नाही

मारुती सुझुकीचे सिनिअर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (मार्केटिंग अँड सेल्स) शशांक श्रीवास्तव यांनी कारच्या किंमती वाढविण्यामागील धोरण स्पष्ट केले. काही मॉडेलच्या किंमतीत जास्त वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. सध्या महागाईचा मार होत आहे. अनेक यांत्रिकी उपकरणाचे दर वाढले. जानेवारीत अनेक मॉडेल्सच्या किंमतीत वाढ होईल. यापूर्वी कंपनीने एप्रिल महिन्यात किंमतीत 0.8 टक्क्यांची वाढ केली होती. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 2.4 टक्क्यांची वाढ केली.

हे सुद्धा वाचा

टाटा मोटर्स पण नाही मागे

टाटा मोटर्स प्रवाशी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत जानेवारीत वाढीचा विचार करत आहे. कंपनीने अजून दरवाढीचे पत्ते उघडले नाहीत. पुढील वर्षात प्रवाशी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत वाढीवर विचार सुरु असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. कोणत्या वाहनाची किती किंमत वाढविण्यात आली, याची माहिती काही आठवड्यात समोर येईल. टाटाच्या हॅचबॅक टियागोपासून ते एसयुव्ही सफारीपर्यंत अनेक कारचा समावेश आहे. त्यांची किंमत 5.6 लाख रुपये ते 25.94 लाख यांच्या दरम्यान आहे.

वाहनांच्या किंमती वाढतील

पुढील वर्षात, जानेवरी 2024 पासून वाहनांच्या किंमतीत वाढीचा इरादा महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विभागाचे सीईओ नलिनीकांत गोलागुंटा यांनी व्यक्त केला. याविषयीची घोषणा योग्यवेळी करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ऑडी कंपनीने पण कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमतींचा दाखला देत पुढील वर्षापासून दरवाढीचे संकेत दिले. भारतात ऑडीच्या वाहनांची किंमत 42.77 लाख ते 2.22 कोटी रुपयांदरम्यान आहे.

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.