Electric Bike : ऐकलत का? या इलेक्ट्रिक बाईकवर सरकार देतेय तब्बल 40 हजारांची सबसिडी
कंपनीची पहिली ई-बाइक CSR 762 लवकरच दाखल होणार आहे. अपकमिंग बाईकचा टॉप स्पीड 120 Kmph इतका असणार आहे. सिंगल चार्जवर स्कूटरची सर्टिफाइड रेंज 110 किमी असू शकते. रिपोर्टनुसार, कंपनीने CSR 762 ची किंमत 1.65 लाख रुपये (एक्सशोरुम) ठेवली आहे.
भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) बाईक्सच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे साहजिकच या सेगमेंटचा विस्तारदेखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. देशातील एक नवीन स्टार्टअप कंपनी स्विच मोटोकॉर्प (Svitch MotoCorp) ने देखील नवीन इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीची पहिली ई-बाइक CSR 762 लवकरच दाखल होणार आहे. अपकमिंग बाईकचा टॉप स्पीड 120 Kmph इतका असणार आहे. सिंगल चार्जवर स्कूटरची सर्टिफाइड रेंज 110 किमी असू शकते. रिपोर्टनुसार, कंपनीने सीएसआर 762 (CSR 762) ची किंमत 1.65 लाख रुपये (एक्सशोरुम) ठेवली आहे. परंतु यावर तब्बल 40 हजार रुपयांची सबसिडी मिळणार आहे. या लेखातून बाइकच्या स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती घेणार आहोत.
काय आहे स्पेसिफिकेशन्स
स्विच मोटोकॉर्पची पहिल्या ई-बाइकचे डिझाईन गुजरातच्या एशियाटिक लॉयनच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. युसर्जला यात 3.7 kWh ची लीथिअम आयन बॅटरी मिळणार आहे. विशेष म्हणजे या बॅटरीला स्वॅपदेखील करता येणार आहे. या बॅटरीला कंबाइंड चार्जिंग सिस्टम (CCS) बॅटरी चार्जरच्या माध्यमातूनही चार्ज केले जाउ शकते. युजर्सला यात 110 किमीपर्यंत रेंज मिळणार आहे.
नवीन फीचर्स
युजर्सला CSR 762 मध्ये तीन राइडिंग मोड मिळणार आहेत. अपकमिंग ई-बाइक, स्पोर्टस, रिव्हर्स आणि पार्किंक मोडसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. बाइकमध्ये 3 kW परर्मनेंट मॅग्नेट सिंक्रोनॉस मोटरशिवाय एक सेंट्रल ड्राइव्ह सिस्टम देण्यात आली आहे. युजर्सला यात एक 5 इंचाची टीएफटी कलर डिसप्ले आणि कुलिंगसाठी थर्मोसाइफोन सिस्टम मिळणार आहे.
100 कोटी रुपयांची गुंतवणूक
भारतीय ईव्ही स्टार्टअप स्विच मोटोकॉर्पने 2022 मध्ये सीएसआर 762 प्रोजेक्टवर 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने देशभरात 15 हून जास्त इलेक्ट्रिक बाइक डिलरशिप शोरुमसोबत डील केली आहे. राजकुमार पटेल यांच्या माहितीनुसार, ही गुंतवणूक सीएसआर 762 च्या लांचला एक चांगले यश प्राप्त करुन देण्यास मदत करणार आहे.