सर्वाधिक लोकप्रिय आहे मारुतीची ‘ही’ सेडन कार… मायलेज अन् स्पेसमध्ये एकदम परफेक्ट
एप्रिल 2022 ची आकडेवारी पाहिल्यास सेडन कारच्या सेगमेंटमध्ये मारुतीच्या कोणत्या कारची सर्वाधिक विक्री झाली हे लक्षात येईल. मारुतीनंतर दुसऱ्या क्रमांकावर होंडा आणि तर तिसऱ्या क्रमांकावर ह्युंडाई कारचे नाव येते.
देशात सेडन कारचा (sedan cars) मोठा चाहता वर्ग आहे. लग्झरी फीचर्ससोबतच चांगला लूक असलेल्या अनेक सेडन कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये (Auto Market) उपलब्ध आहेत. मारुती, होंडा, ह्युंडाई, टाटा, स्कोडा सारख्या अनेक कंपन्या आहे, ज्यांच्या सेडन कार्सना बाजारात मोठी मागणी आहे. एप्रिल 2022 ची आकडेवारी पाहिल्यास सेडन कारच्या सेगमेंटमध्ये मारुतीच्या कोणत्या कारची सर्वाधिक विक्री झाली हे लक्षात येईल. मारुतीनंतर दुसऱ्या क्रमांकावर होंडा आणि तर तिसऱ्या क्रमांकावर ह्युंडाई कारचे नाव येते. टाटादेखील या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर, स्कोडाचाही सहावा क्रमांक लागतो. गेल्या काही महिन्यांमध्ये कुठल्या कारची सर्वाधिक विक्री (Sale) झाली, याची माहिती आज आपण घेणार आहोत.
1) मारुती सुझुकी डिझायर
एप्रिल 2022 मध्ये सर्वात जास्त विक्री झालेल्या कारमध्ये डिझायरचे नाव सर्वात वर येते. मारुतीच्या डिझायरच्या 10701 युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या वर्षी एप्रिल 2021 मध्ये कंपनीने 14073 युनिट्सची विक्री केली होती. एकूण विक्री होणाऱ्या सेडन कारमध्ये एकट्या डिझायरचा वाटा 36.27 टक्के इतका आहे.
2) होंडा अमेझ
सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडन कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होंडाच्या अमेझ कारचा नंबर येतो. होंडाने गेल्या महिन्यात 4467 कार्सची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत होंडाने 547 अमेझ कार्सच्या जास्त युनिट्ची विक्री केली आहे. एकूण विक्री होत असलेल्या सेडन कारच्या विक्रीमध्ये अमेझचा वाटा 15.14 टक़्के आहे.
3) ह्युंडाई ओरा
नुकत्याच लाँच झालेल्या कार्सच्या यादीत ह्युंडाईच्या ओराने चांगले प्रदर्शन केले आहे. गेल्या महिन्यात ह्युंडाईने 4035 ओरा कार युनिटची विक्री केली होती. ही विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 547 ने जास्त होती. एकूण विक्री होत असलेल्या सेडन कार्समध्ये ओराचा वाटा 13.68 टक़्के आहे.
4) टाटा टिगोर
आपल्या मजबुतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टाटाच्या टिगोरला ग्राहकांकडून चांगली मागणी राहिली आहे. एप्रिल 2022 मध्ये टाटाने एकूण 3803 टाटा टिगोरच्या युनिटची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 1627 ने जास्त आहे. सेडन कारमध्ये टाटाने टिगोरच्या मदतीने 133 टक्के जास्त वाढ मिळवली आहे.
5) स्कोडा स्लाविया
स्कोडाने आपल्या सर्वाधिक विक्री होत असलेल्या रॅपिड कारला बंद करुन स्लाविया लाँच केली होती. ही कारदेखील सामान्य लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. एप्रिल महिन्यात स्कोडाने स्लावियाची एकूण 2431 युनिटची विक्री केली आहे.