नवीन Jawa 42 बाजारात दाखल होणार पाहा काय आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत ?

टु व्हील चालविणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. क्रुझर आणि रेट्रो बाईकमध्ये नाव असलेल्या रॉयल एनफिल्डने नवे मॉडेल लॉंच केल्यानंतर आता जावा 42 आपले नवीन मॉडेल दाखल करीत आहे.

नवीन Jawa 42 बाजारात दाखल होणार पाहा काय आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत ?
jawa 42 bike
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 8:10 PM

टु व्हील चालविणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चे नवे मॉडेल नुकतेच लॉंच झाले आहे. भारतीय बाजारात या बाईकची टक्कर जावा 42 सारख्या बाईक्स बरोबर होते. आता जावा यझडी मोटर सायकल कंपनीने  रॉयल एनफिल्डच्या नव्या बाईकला टक्कर देण्याची तयारी केली आहे. 3 सप्टेंबर रोजी जावा 42 कंपनी आपल्या मॉडेलच्या वैशिष्ट्यांवरील पडदा उघडणार  आहे.

अलिकडेच दुचाकी ब्रॅंड रॉयल एनफिल्डने क्लासिक 350 नवीन क्लासिक मॉडेलचे लॉंचिंग केले आहे. क्रुझर आणि रेट्रो बाईकमध्ये सर्वात मोठे नाव रॉयल एनफील्डचे आहे. जावा मोटरसायकल सारख्या कंपन्यांशी तिची स्पर्धा आहे. रॉयल एनफिल्डची नवीन क्लासिक 350 लॉचिंग झाली आहे. आणि तीन सप्टेंबर रोजी जावा नवीन बाईक लॉंच करुन  याला उत्तर देणार आहे.  कंपनीने सोशल मिडीयावर जावाच्या  नवीन बाईक संबंधी पोस्ट शेअर केली आहे. या ट्रीझरमुळे स्पष्ट झाले आहे की आता तीन सप्टेंबरला नवीन जावा 42 बाईक लॉंच होणार आहे.

जावा मोटर सायकल कंपनीने नवीन जावा 42 च्या नव्या आवृत्तीला टझर लॉंच केलेला आहे. यात नव्या जावा बाईकच्या काही वैशिष्ट्यांचा अंदाज आलेला आहे.या जावा 42 बाईकला जादा स्पोर्टी आणि रोड स्टार लुक दिल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या जावा 42 बाईकच्या मॉडेल्स पेक्षा नवीन आवृतीचा टियरट्रॉप फ्यूएल टॅंक मोठा दिसत आहे. नवीन बाईकवर जावा ‘Jawa’ स्टीकर याला खास बनविले आहे.

नवीन जावा 42 बाईकचे साईड आणि टेल पॅनल एक सारखेच दिसत आहेत. याशिवाय याला एक कॉम्पॅक्स सीट्स आणि सीट्स खाली पिलियन -ग्रॅब रेल देखील पाहायला मिळणार आहे. जावा कंपनीने या मॉडेलच्या वरच्या बाजूला एक्झॉस्ट पाईपची सोय केलेली दिसत आहे. जो स्पोर्टी पोझिशनिंग सारखा दिसत आहे. नव्या जावा बाईकमध्ये आधीच्या चेसिसचा नव्या बाईक्ससाठी केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे.

New Jawa 42 ची चाकं वेगळी असणार ?

जावाच्या नव्या मोटरसायकलला एक वेगळे अलॉय व्हील डिझाईन करण्यात आलेले आहे. या शिवाय डायमंड कट इफेक्टची देखील आशा आहे. हे सुविधा केवळ टॉप मॉडेलसाठी राखीव ठेवलेली असू शकते. नवी जावा 42 मध्ये मोठा बदल म्हणजे या बाईकचे टायर असू शकतात. नव्या मॉडेलमध्ये जावा 42 चे टायर जाडे असण्याची शक्यता आहे.

New Jawa 42: संभाव्य किंमत किती ?

नवीन जावा 42च्या इंजिनच्या संदर्भात काहीही माहिती दिलेली नाही. या व्हेरिएंटमध्ये जावा 350 इंजिनाचा वापर केला जाऊ शकतो. जे 334 cc सिंगल-सिलेंडर इंजिनसह उपलब्ध होते. या इंजिनला नव्या बाईकचा वापरानूसार ट्युन करण्याची आशा आहे.  3 सप्टेंबरला लॉन्च होणाऱ्या जावा 42 च्या वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.10 ते 2.20 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला 1.99 ते 2.30 लाख रुपये किंमतीत (एक्स-शोरूम) लॉन्च केले जाऊ शकते.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.