MG मोटर्स कंपनीच्या ‘या’ गाड्यांची किंमत वाढणार, जाणून घ्या नेमकं कारण काय?
एमजी मोटर्सच्या गाड्यांच्या किंमती 1 मार्च 2023 पासून वाढणार आहेत. यामध्ये एसयुव्ही हेक्टर, ग्लोस्टर, अॅस्टर आणि इलेक्ट्रिक एसयुव्ही झेडएस इव्हीचा समावेश आहे. या गाड्यांच्या किमती मार्च महिन्यापासून जवळपास 60 हजार रुपयांनी वाढणार आहे.
मुंबई : एमजी मोटर्स आपल्या गाड्यांच्या किमती लवकरच वाढवणार आहे. यामध्ये एसयुव्ही हेक्टर, ग्लोस्टर, अॅस्टर आणि इलेक्ट्रिक एसयुव्ही झेडएस इव्हीचा समावेश आहे. या गाड्यांच्या किमती मार्च महिन्यापासून जवळपास 60 हजार रुपयांनी वाढणार आहे. ही वाढीव किंमत सर्व मॉडेल आणि व्हेरियंटला लागू असणार आहे. कंपनीने कार्बन उत्सर्जन मानकानुसार आपल्या गाड्यांच्या इंजिनमध्ये अपडेट आरडीई (Real Driving Emission) अंतर्गत करणार आहे. यामुळे या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढणार आहेत. भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांना आता बीएस 6 स्टँडर्ड्स अनिवार्य आहे. बीएसनंतर जो नंबर येतो त्यावरून वाहन किती प्रदूषण करतं हे ठरतं. यापूर्वी भारतात बीएस 4 नियमावली लागू आहे. एमजी मोटर्सप्रमाणे ह्युंदाई मोटर्स आणि टाटा मोटर्सही आपल्या गाड्यांची किंमत वाढवणार आहे. या कंपन्यांनी हेच कारण यामागे असल्याचं सांगितलं आहे.
एमजी मोटर्सचं सर्वाधिक मागणी असलेलं हेक्टर मॉडेल महागणार आहे. डिझेल व्हेरियंटची किंमत 1 मार्चपासून 60 हजार रुपयांनी महागणार आहे. तर पेट्रोल व्हेरियंटची किंमत 40 हजार रुपयांनी वाढणार आहे.एमजी एसयुव्ही ग्लोस्टरची किंमत 60 हजार रुपयांनी वाढणार आहे. तर झेडएस इव्ही इलेक्ट्रिक एसयुव्हीची किंमत 40 हजार रुपयांनी, तर अॅस्टर एसयुव्हीची किंमत 30 हजार रुपयांनी वाढणार आहे.एमजी मोटर्सने नव्या दमाची हेक्टर एसयुव्ही नुकतीच लाँच केली आहे. या गाडीची किंमत 14.73 लाख (एक्स शोरुम) इतकी आहे. या गाडीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल, 1.5 लिटर हायब्रिड आणि 2.0 लिटर डिझेल इंजिन पर्याय आहेत.
नवी बीएस 6 प्रणाली देशात 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी Phase 2 बीएस6 मानक सर्व वाहनांवर लागू होणार आहे. त्यामुळे गाड्यांमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. या कारणामुळे गाड्यांच्या किमती वाढणार आहे. नुकतंच टाटा मोटर्सनं आपल्या काही मॉडेलचं बीएस 6 अंतर्गत अपडेट केलं आहेत. यामध्ये नेक्सन, हॅरिअर, पंच आणि इतर कारचा समावेश आहे.
बीएस 6 च्या तुलनेत बीएस 4 इंजिन सर्वाधिक प्रदूषण करतात. बीएस 4 मधून बीएस 6 च्या तुलनेत पाच पटीने सल्फर निघतं. त्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होतं. यामुळे डोळे चुरचुरणं, फुफ्फुसाचे इन्फेक्शन, डोकेदुखीसारख्या समस्या जाणवतात.याआधी 2017 मध्ये भारतात बीएस 4 नियमावली लागू केली होती. तर 2010 पासून भारतात बीएस 3 इंजिन असलेली वाहनं विकली जात होती. 2000 ते 2010 पर्यंत या दहा वर्षात भारतात बीएस 2 इंजिन असेलीली वाहनं विकली जात होती.