Skoda EV पण मैदानात! नेक्सॉन ईव्हीला आस्मान दाखवणार

नवी दिल्ली | 16 February 2024 : स्कोडा ऑटो इलेक्ट्रिक कारवर भर देत आहे. भारतात आता इलेक्ट्रिक वाहनाचं युग सुरु झालं आहे. त्याचा फायदा अनेक कंपन्या घेत आहे. त्यात स्कोडाला पण फायदा घ्यायचा आहे. स्कोडा त्यासाठी भारतात किफायतशीर इलेक्ट्रिक कार उतरविण्याच्या विचारात आहे. देशात इलेक्ट्रिक कारमध्ये टाटा मोटर्सने मोठी झेप घेतली आहे. स्कोडा देशात इलेक्ट्रिक […]

Skoda EV पण मैदानात! नेक्सॉन ईव्हीला आस्मान दाखवणार
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 4:03 PM

नवी दिल्ली | 16 February 2024 : स्कोडा ऑटो इलेक्ट्रिक कारवर भर देत आहे. भारतात आता इलेक्ट्रिक वाहनाचं युग सुरु झालं आहे. त्याचा फायदा अनेक कंपन्या घेत आहे. त्यात स्कोडाला पण फायदा घ्यायचा आहे. स्कोडा त्यासाठी भारतात किफायतशीर इलेक्ट्रिक कार उतरविण्याच्या विचारात आहे. देशात इलेक्ट्रिक कारमध्ये टाटा मोटर्सने मोठी झेप घेतली आहे. स्कोडा देशात इलेक्ट्रिक कार तयार करुन ती परदेशात पण विक्रीच्या तयारीने उतरणार आहे. कंपनीने कार आणि तिच्या किंमतीविषयी माहिती दिली नाही. पण एका अंदाजानुसार, या कारची किंमत 20 लाख रुपयांच्या आत असेल. पण त्यामध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा असतील.

कशी असू शकते कार

स्कोडा तिची आगामी इलेक्ट्रिक कार ग्लोबल एमईबी प्लॅटफॉर्मचा वापर करुन आणणार आहे. या कारचे समोरील व्हील या प्लॅटफॉर्मचा वापर करुन तयार करण्यात येतील. यापूर्वी महिंद्राने या प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. कंपनीने INGL इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मसाटी एमईबी कंपोनेंट्ससाठी स्कोडाची मुळ कंपनी फॉक्सवॅगनसोबत करार केला आहे. अर्थात कुशाक या मॉडेलवरच स्कोडाचे इलेक्ट्रिक कार आधारीत असेल, याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण ही एक 4 मीटर एसयु्व्ही असण्याची दाट शक्यता आहे.

कार कधी येणार बाजारात

ही नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात कधीपर्यंत येणार याविषयी कंपनीने खुलासा केला नाही. पण ही नवीन कार येत्या दोन ते तीन वर्षांत भारतीय बाजारात येऊ शकते. पण त्यापूर्वी या कारचे आयसीई व्हर्जन बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही कार कदाचित पुढच्याच वर्षी बाजारात इतर कंपन्यांना टफ फाईट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोणत्या कारसोबत होईल सामना

ही इलेक्ट्रिक कार बाजारात उतरल्यास तिचा थेट सामना टाटा नेक्सॉन ईव्ही आणि महिंद्रा एक्सयुव्ही 400 सोबत होईलल. नेक्सॉन ईव्हीमध्ये 465 किलोमीटर प्रति चार्जपर्यंतची रेंज मिळते. टाटा मोटर्सने या कारची किंमत 1.2 लाख रुपयांनी कमी केली आहे.  त्यामुळे ग्राहकांना ही कार स्वस्तात खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.